शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साधा खोकला आला तरीही नागरिक धावताहेत दवाखान्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:04 IST

सोलापूर शहरातील रूग्णांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली; खबरदारी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

ठळक मुद्देगेल्या आठवडाभरात उपचारासाठी येणाºया रूग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ शहरात सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढलेले असले तरी डॉक्टरांनी घाबरून न जाण्याचा सोलापूरकरांना सल्ला दिलाफक्त धुळीमध्ये फारसे न फिरता आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा, असे आवाहन केले

दीपक दुपारगुडे

सोलापूर : सोलापूर शहरात विशेषत: गावठाण भागामध्ये ठिकठिकाणी जलवाहिनीच्या कामांमुळे प्रमुख रस्ते खोदलेले आहेत. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. ही धूळ  खोकला आणि सर्दीला निमंत्रण देत असून, हे दोन्ही आजार कोरोना संसर्गाच्या लक्षणांमध्ये येत असल्याने भयभीत होऊन सोलापूरकर दवाखाना गाठत आहेत. गेल्या आठवडाभरात उपचारासाठी येणाºया रूग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ झाली.

शहरात सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढलेले असले तरी डॉक्टरांनी घाबरून न जाण्याचा सोलापूरकरांना सल्ला दिला असून, फक्त धुळीमध्ये फारसे न फिरता आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे. सर्दी, खोकल्यामुळे आपण कोरोनासंशयित व्यक्तीच्या संपर्कात तरी आलेलो नाहीत ना? अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.  रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना हा त्रास तीव्रतेने जाणवत आहे. साबण, हॅण्डवॉश व पाण्याचा वापर करुन हात सतत स्वच्छ करावेत शिंकताना किंवा खोकताना नाकावर व तोंडावर रुमाल झाकावा. सर्दी किंवा फ्लूसदृश लक्षणे असलेल्यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला व आवश्यक ते उपचार घ्यावेत. मांसाहार किंवा अंडी खाताना त्या शिजलेल्या किंवा उकडलेल्या आहेत, याची खात्री करावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

गेल्या आठवडाभरात अशा रुग्णांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली आहे. शहरात सध्या कोरोनाचा रूग्ण आढळला नसला तरी कोरोनाच्या धास्तीने फक्त सर्दी-खोकला अशी लक्षणे आढळल्यास नागरिक तपासणीकरिता येत आहेत. लोक भीतीने आम्हाला कोरोनाची लागण तरी झाली नाही ना, अशी विचारपूस करीत आहेत. नागरिकांनी न घाबरता खबरदारी घेणे गरजेचे आहे.-डॉ. गिरीश हरकुड कान, नाक, घसा तज्ज्ञ़

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणे दिसतात. सध्या कोरोनामुळे दररोज चार ते पाच रूग्ण तपासणीसाठी येत आहेत. विशेष म्हणजे शहरात सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. शहरात सगळीकडे तंबाखूमिश्रित धूळ आहे़ कारण शहरात सर्रास तंबाखूजन्य पदार्थ हवेत मिसळलेले आहेत. -डॉ.जलील मुजावर कान, नाक, घसा तज्ज्ञ़

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल