शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिटीझन पोर्टलचा ग्रामीण भागातही उत्तम वापर, सोलापूरकरांचे पोलिसांकडील हेलपाटे टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:05 IST

सिटीझन पोर्टलद्वारे नागरिकांना पोलिसांकडे आॅनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, याचा वापर ग्रामीण नागरिक मोठ्या प्रमाणावर करत आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र पोलीस सी.सी.टी.एन.एस. प्रकल्पांतर्गत नागरिकांकरिता आॅनलाईन सुविधा पुरविण्यात आल्यानागरिकांना त्यांच्या सोयीनुसार महाराष्ट्र पोलीस दलाबाबत महत्त्वाची माहिती ही एका क्लिवर सिटीझन पोर्टलमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेई-तक्रार केंद्रात तीन महिन्यात ग्रामीण भागातील ५६ आॅनलाईन तक्रारी आल्या, त्याचा निपपोटारा ग्रामीण पोलिसांनी केला.

अमित सोमवंशी सोलापूर दि ५ : सिटीझन पोर्टलद्वारे नागरिकांना पोलिसांकडे आॅनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, याचा वापर ग्रामीण नागरिक मोठ्या प्रमाणावर करत आहेत. यामुळे आता त्यांच्या पोलीस ठाण्यातील हेलपाटे कमी झाले. आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-तक्रार केंद्रात तीन महिन्यात ग्रामीण भागातील ५६ आॅनलाईन तक्रारी आल्या. त्याचा निपपोटारा ग्रामीण पोलिसांनी केला.महाराष्ट्र पोलीस सी.सी.टी.एन.एस. प्रकल्पांतर्गत नागरिकांकरिता आॅनलाईन सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार महाराष्ट्र पोलीस दलाबाबत महत्त्वाची माहिती ही एका क्लिवर सिटीझन पोर्टलमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे याच पोर्टलवर कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा (एफआयआर), हरविलेली मालमत्ता, चोरीस गेलेले वाहन, अनोळखी मृतदेह, बाबतची माहिती. तसेच सार्वजनिक मंडळांमार्फत घेण्यात येणारे उत्सव याकरिता सिटीझन पोर्टलद्वारे आॅनलाईन परवानगीकरिता अर्ज करण्याची सुविधा पुरविण्यात आलेली आहे.सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नियंत्रण कक्ष सर्व पोलीस ठाण्याशी इंटरनेटद्वारे जोडण्यात आले आहेत. तीन महिन्यात ५६ आॅनलाईन तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या. त्या तक्रारींची  ई-तक्रार केंद्रामधून आॅनलाईन नोंदवून संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग होऊन त्याची चौकशी करुन तपास करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कर्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.----------------------------तीन हजार जणांनी केले मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड- सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील आपत्कालीन तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी पीडित नागरिकांना विशेषत : महिला व युवतींना तत्काळ पोलिसांची मदत मिळण्याकरिता मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले होते. हा अ‍ॅप तीन हजार नागरिकांनी डाऊनलोड केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.---------------तात्काळ डिजिटल प्रतआॅनलाईन तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यास त्याची तक्रार ई-तक्रार केंद्रामधून आॅनलाईन नोंदवून संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग होऊन त्याची चौकशी व तपास करण्यात येते. त्यानंतर पोलीस पुढील कारवाई करण्यासाठी पाऊले उचलतात़ तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदारास त्याच्या ई-मेल आयडीवर हरवलेल्या वस्तू, साहित्य, कागदपत्रे यांची डिजिटल सिग्नेचरची प्रत तत्काळ प्राप्त होते़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस