शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला निर्वस्त्र आठ किलोमीटर चालवून नवस केला पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 14:26 IST

मश्रुम गणपतीची केली पूजा : मुलाचे नावही ठेवले गणेश; तब्बल आठ किलोमीटर पायपीट

ठळक मुद्देमुलाला निर्वस्त्र चालवित असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेमंदिरात पोहोचल्यावर तेथील पुजारी भडंगे यांनी गणेशच्या हस्ते आरती करून घेतलीराहत्या घरापासून गणपती मंदिरापर्यंत सुमारे आठ कि. मि.  चालवत आणले

यशवंत सादूल 

सोलापूर : आपल्याला मूल व्हावे असा नवस संगमेश्वर नगर येथील नागेश व शीतल रणधिरे या दांपत्याने हिप्परगानजीक असलेल्या मश्रुम गणपतीला  केला होता. नवस पूर्ण होऊन मूल तीन वर्षांचे झाल्याने नवस फेडण्यासाठी त्याला वस्त्र परिधान न करता संगमेश्वर नगर येथील राहत्या घरापासून गणपती मंदिरापर्यंत सुमारे आठ कि. मि.  चालवत आणले आणि गणरायाचे दर्शन घेतले. 

नागेश रणधिरे हे ट्रकचालक आहेत. त्यांचा विवाह  २०१३ मध्ये झाला. सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या हिप्परग्याजवळील मश्रुम गणपतीवर त्यांची अफाट श्रद्धा आहे. मूल झाल्यास त्याला वस्त्र परिधान न करता चालवित दर्शनाला घेऊन येईन, असा नवस बोलला होता. त्यांना २९ सप्टेंबर २०१५ ला मुलगा जन्मास आला. आज तो साडेतीन वर्षांचा असून त्याचे नावही श्रद्धेपोटी गणेश असे ठेवले.त्याला चालता येत असल्याने लहानपणीच हा नवस पूर्ण केलेला बरा या हेतूने बुधवारी सकाळी या मुलाला निर्वस्त्र पायी चालवत आणले. कोजागरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक तुळजापूरला पायी चालत जातात. हा योग साधून आजचा दिवस निवडला.

संगमेश्वरनगर येथील राहत्या घरापासून मुलाला घेऊन हिप्परगा तलावानजीक असलेल्या मश्रुम गणपतीच्या वाटेवर निघाले. या सात ते आठ किलोमीटरच्या अंतरात लहानग्या गणेशने आईबाबांकडे एकदाही कडेवर घेण्याचा हट्ट केला नाही. मंदिरात पोहोचल्यावर तेथील पुजारी भडंगे यांनी गणेशच्या हस्ते आरती करून घेतली. 

येणा-जाणाºयांना कुतूहल- त्याला निर्वस्त्र चालवित असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. काहींनी उघडे नका नेऊ, अंगावर कपडे तर घाला, असा सल्लाही दिला. अनेकांनी उत्सुकतेपोटी असे चालविण्याचे कारण विचारून घेतले. मार्गातील नागरिकांकडून होणाºया प्रश्नांची शांतपणे उत्तरे देत या दांपत्याने मुलासह मार्गक्रमण सुरूच ठेवले. येणा-जाण्याºयांनामात्र याचे कुतूहल वाटून राहिले.

- मूल व्हावे यासाठी आम्ही गणपतीला नवस बोलला होता. ईश्वरकृपेने २९ सप्टेंबर २०१५ ला मुलगा झाला; योगायोग असा की, पुढच्या वर्षी २०१६ ला याच तारखेला आम्हाला मुलगी झाली. त्यामुळे बोललेला नवस पूर्ण करणे आमचे कर्तव्य होते. यात कसलीही अंधश्रद्धा नसून ही आमची गणपतीवरील नितांत श्रद्धा आहे. - शीतल व नागेश रणधिरे, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूर