शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रिंगण सोहळ्यांनी वारकऱ्यांमध्ये चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 02:33 IST

पालखी सोहळा वाखरीत; विठ्ठल-रुक्माईचा जयजयकार

गोपालकृष्ण मांडवकर/शहाजी फुरडे-पाटीलवाखरी (जि. सोलापूर) : विठुरायाची ओढ लागलेल्या वारकºयांनी शनिवारी माऊली आणि तुकोबांच्या पालखीत रिंगणाचा सोहळा अनुभवला. विठ्ठल-रुक्माईच्या जयघोषात वारकºयांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते.पालखी सोहळे वाखरीकडे येत असताना दुपारी ३ वाजता सोपनकाकांच्या पालखीचे आगमन झाले. या सोहळ्यातील अश्वानी एक रिंगण पूर्ण केले. त्यानंतर त्याच ठिकाणी व माऊलींचेही उभे रिंगण पार पडले. माऊलींचे गोल रिंगण झाल्यानंतर शेवटी तुकोबांचे उभे रिंगण झाले. हे रिंगण सोहळे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.नेहमीप्रमाणे सकाळी लवकर प्रस्थान नसल्याने जादा विश्रांती घेऊन पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी थांबलेला संत तुकारामांचा पालखी सोहळा दुपारी वाखरीकडे वाटचाल करू लागला. वाटेत बाजीराव विहीर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या शेवटच्या उभ्या रिंगणाचा आनंद मनात साठवून अन् संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण पाहून संत तुकोबारायांचा पालखी सोहळा वारीतील शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरीत सर्वसंत-महंतांच्या बरोबरीने विसावला.रथाबरोबर मध्ये उभे असलेले वारकरी विठुनामाचा गजर करीत तल्लीन होऊन नाचत होते आणि अश्व कधी एकदाचा येतोय, याचीच वाट पाहत होते. काही वेळाने दोन्ही अश्व दाखल झाले. दोन्ही अश्वांनी एक फेरी पूर्ण करून रिंगण पूर्ण केले. अश्वांचे रिंगण पूर्ण होताच दिंड्यादिंड्यांमध्ये फुगडीचा खेळही चांगलाच रंगला.बाजीराव विहिरीजवळ ६ लाखांची गर्दीबाजीराव विहीर येथील हे रिंगण सोहळे शेवटचे असल्याने जिल्ह्यातील लाखो भाविक रिंगण पाहण्यासाठी जमले होते. तुकोबांच्या उभ्या रिंगणाबरोबर माऊलींचे सुरुवातीला उभे व नंतर गोल रिंगण पार पडले. यावेळी वारकºयांचा माऊली-तुकाराम असा गजर सुरूच होता. तसेच प्रत्येक दिंडीमध्ये हरिपाठाचे गायन सुरू होते. पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या विविध संतांचे सोहळे एकामागून एक बाजीराव विहीर चौकात येत होते. त्यामुळे याठिकाणी सुमारे सहा लाखांची गर्दी झाली होती.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरSolapurसोलापूर