शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागा नदीपात्रात गाढवांच्या मदतीने वाळूचोरी, जिल्हाधिकाºयांनाच दिसला प्रकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 12:49 IST

वाळूचोरी थांबवण्यासाठी नागरिकांना बरोबर घेऊन गस्त घालण्यासाठी पथक नेमावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले देत असतानाच स्मशानभूमीजवळील नदीपात्रातून गाढवांच्या सहाय्याने दिवसा वाळूचोरी सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

ठळक मुद्देस्मशानभूमी घाटाजवळील नदीपात्रातून गाढवाच्या सहाय्याने वाळू उपसा सुरुमहसूलच्या कर्मचाºयांनी संबंधित वाळू चोरावर कारवाई केली नाहीविष्णूपद जवळील बंधाºयाची दरवाजे वाळू चोर काढून टाकतातवाळू चोरीसाठी बंधाºयातून सोडतात पाणी

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि २१ : चंद्रभागा नदीपात्रातून होणाºया वाळू उपशामुळे चंद्रभागेत खड्ड्यांचे साम्राज निर्माण होऊन अनेक भाविकांना जीव गमवावा लागत आहे. यामुळे वाळूचोरी थांबवण्यासाठी नागरिकांना बरोबर घेऊन गस्त घालण्यासाठी पथक नेमावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले देत असतानाच स्मशानभूमीजवळील नदीपात्रातून गाढवांच्या सहाय्याने दिवसा वाळूचोरी सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.पंढरपूर शहरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आले होते. यादरम्यान त्यांनी चंद्रभागा नदीची पाहणी केली. यावेळी त्यांना वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागा वाळवंटात चोरुन वाळू उपसा होत असल्याची माहिती दिली.चंद्रभागा वाळवंटात दिवस-रात्र गाढवांच्या सहाय्याने वाळूचोरी होते. यामुळे चंद्रभागा नदीपात्रात जागोजागी खड्डे पडत आहेत. या खड्ड्यांबाबत चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी येणाºया भाविकांना जाणीव नसते. यामुळे ते चंद्रभागा पात्रात गेल्यानंतर अचानक त्यांना खड्डे लागतात. त्यामुळे ज्यांना पोहणे जमत नाही, अशा भाविकांना व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. नदीपात्रातून होणारी वाळूचोरी थांबवावी, अशी मागणी होत आहे. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वाळूचोरी होऊ नये, यासाठी गस्त घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मदत घ्या, अशी सूचना तहसूलदार मधुसूदन बर्गे, प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, सहायक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना केली. सूचना सुरू असतानाच दुपारी एकच्या सुमारास स्मशानभूमी घाटाजवळील नदीपात्रातून गाढवाच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु होता; मात्र त्याठिकाणी महसूल कर्मचारी बघ्याची भूमिका घेत उभे होते. वाळू उपसा सुरु असल्याची माहिती सहा. पो. अधीक्षक निखिल पिंगळे यांना समजताच ते तत्काळ त्याठिकाणी पोहचले; मात्र तोपर्यंत त्याठिकाणावरुन वाळू चोरांनी पोबारा केला होता.---------------------------वाळू चोरीसाठी बंधाºयातून सोडतात पाणीचंद्रभागा नदीपात्रात भाविकांना पवित्र स्नान करण्यासाठी पाणी रहावे, यासाठी चंद्रभागा नदीवर विष्णूपदाजवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात पाणी राहते, परंतु त्यामुळे वाळू चोरी करताना वाळू चोरांना अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे विष्णूपद जवळील बंधाºयाची दरवाजे वाळू चोर काढून टाकतात. यामुळे चंद्रभागा नदीपात्रातील पाणी कमी होते. तसेच पुंडलिक मंदिराजवळ पाण्याचे डबके साठते, त्याच डबक्यात भाविक पवित्र स्नान करतात.----------------------महसूल कर्मचाºयांची बघ्याची भूमिका- स्मशानभूमी घाटाजवळील नदीपात्रातून गाढवाच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु होता; मात्र त्याठिकाणी उपस्थित असलेल्या महसूलच्या कर्मचाºयांनी संबंधित वाळू चोरावर कारवाई केली नाही. फक्त बघ्याची भूमिका घेत उभे होते.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय