शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल-रुक्मिणी मातेची चंदनउटी पूजा बंद; ऋतूचक्र बदलल्याने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:36 IST

पंढरपूर मंदिर समितीची माहिती; पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर ३० जूनपर्यंत बंद राहणार

ठळक मुद्दे१७ मार्चपासून भाविकांसाठी मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला होतामंदिर समितीमध्ये काम करणाºया ५० हून अधिक कर्मचाºयांच्याच हस्ते विनामूल्य चंदनउटी पूजाश्री विठ्ठलाच्या चंदनउटी पूजेसाठी १७ हजार रुपये तर श्री रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी ८ हजार ५०० रुपये भाविकांकडून घेतले जातात

पंढरपूर : उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये उष्णता वाढते, यामुळे शरीराचा दाह होऊ नये, शरीराला थंडावा मिळावा, यासाठी पाडव्याच्या दिवसापासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला चंदनउटी पूजा सुरू करण्यात आली होती. मात्र आता ऋतूचक्र बदलल्याने वातावरणात थंडावा निर्माण होत असल्यामुळे चंदनउटी पूजा बंद करण्यात येणार आहे. पूजेची सांगता मंगळवारी होत आहे.

गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद करण्यात आले आहे. मात्र, श्री विठ्ठलाचे नित्योपचार सुरूच होते. शिवाय विविध उत्सवांनिमित्त देखील मंदिरात सजावट करण्यात आली होती. उन्हाळ्याची सुरुवात होताच श्री विठ्ठलाला दाखवण्यात येणाºया नैवेद्यामध्ये बासुंदी हा पदार्थ बंद करून श्रीखंड हा थंड पदार्थ देण्यात आला होता. चंदनउटी पूजा चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू करण्यात आली होती.

 मृग नक्षत्र सुरू झाले आहे. यामुळे चंदनउटी पूजा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी चंदनउटी पूजेचा सांगता समारंभ होणार आहे. यानिमित्त परिवार देवतातील देवीदेवतांची चंदनउटी पूजा केली जाणार असल्याचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

पन्नासहून अधिक कर्मचाºयांनीच केली चंदनउटी पूजा - १७ मार्चपासून भाविकांसाठी मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला होता. श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पूजेसाठी १७ हजार रुपये तर श्री रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी ८ हजार ५०० रुपये भाविकांकडून घेतले जातात. चंदनउटी पूजेसाठी भाविकांनी मंदिर समितीकडे नोंदणी केली होती. परंतु इच्छुक भाविकांना लॉकडाऊनमुळे चंदनउटी पूजा करण्यासाठी मंदिरात येता आले नाही. यामुळे मंदिर समितीमध्ये काम करणाºया ५० हून अधिक कर्मचाºयांच्याच हस्ते विनामूल्य चंदनउटी पूजा करण्यात आली. त्यामध्ये निवृत्त होणाºया कर्मचाºयांचा समावेश होता. शेवटची चंदनउटी पूजाही कर्मचाºयांच्या हस्ते होणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर