शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मध्य रेल्वे; उन्हाळी सुट्टीसाठी एप्रिलपासून रेल्वेच्या विशेष गाड्या

By appasaheb.patil | Updated: March 28, 2019 14:17 IST

शंभराहून अधिक गाड्यांचे नियोजन, प्रवाशांची वाढली गर्दी

ठळक मुद्दे७ एप्रिलपासून या गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाने दिली पुणे ते गोरखपूरदरम्यान ७ एप्रिल ते ३० जून या कालावधीत दर रविवारी विशेष गाडी सोडली जाईलमध्य रेल्वेने मुंबई, पुण्याहून गोरखपूर व मंडुआडीहपर्यंत साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला

सोलापूर : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता व उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई, पुण्याहून गोरखपूर व मंडुआडीहपर्यंत साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ७ एप्रिलपासून या गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्यासोलापूर मंडलाने दिली आहे.

पुणे ते गोरखपूरदरम्यान ७ एप्रिल ते ३० जून या कालावधीत दर रविवारी विशेष गाडी सोडली जाईल. ही गाडी सायंकाळी ७.५५ वाजता पुणे स्थानकातून सुटून तिसºया दिवशी पहाटे ४.३० वाजता गोरखपूरमध्ये पोहोचेल. तर प्रत्येक मंगळवारी सकाळी ७.२५ वाजता गोरखपूर येथून सुटून दुसºया दिवशी सायंकाळी पाच वाजता पुण्यात दाखल होईल. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण २६ फेºया होतील. या गाडीला १२ स्लीपर क्लास, ३ जनरल, २ ब्रेकयान असे एकूण १७ डबे असणार आहेत. ही गाडी पुणे-दौंड-अहमदनगर-बेलापूर-कोपरगाव-मनमाड-भुसावळ-खंडवा-इटारसी-भोपाल-बीना-झांशी-ओराई-कानपूर-बाराबंकी-गोंडा-बस्ती-गोरखपूर असे धावणार आहे.

पुणे ते मंडुआडीह ही विशेष गाडी ११ एप्रिल ते २७ जूनदरम्यान प्रत्येक गुरुवारी पुण्यातून सकाळी ९.३० वाजता सुटेल. तर तिसºया दिवशी पहाटे ३.२५ वाजता मंडुआडीह येथे पोहोचेल. तेथून प्रत्येक शनिवारी पहाटे ४.४५ वाजता सुटून दुसºया दिवशी दुपारी १२ वाजता पुणे स्थानकात येईल. या गाडीला १२ स्लीपर, ३ जनरल, २ ब्रेकयान असे १७ डबे असणार आहेत़ ही गाडी पुणे-दौंड-अहमदनगर-बेलापूर-कोपरगाव-मनमाड- भुसावळ- खंडवा-इटारसी-जबलपूर- कटनी- सतना-माणिकपूर-इलाहाबाद-ज्ञानपूर-मंडूआडीह अशी धावणार आहे़ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२ एप्रिल ते ५ जुलैदरम्यान प्रत्येक सोमवारी पहाटे ५.१० वाजता गोरखपूरसाठी विशेष गाडी सोडली जाईल. ही गाडी दुसºया दिवशी दुपारी १२.१० वाजता गोरखपूर स्थानकात पोहोचेल. तर प्रत्येक शनिवारी गोरखपूर येथून दुपारी २.४० वा. निघून दुसºया दिवशी ८.२५ वाजता पुण्यात पोहोचेल.

मुंबई-मंडुआडीह गाडी १७ एप्रिल ते ३ जुलैदरम्यान धावेल. ही गाडी दुपारी १२.४५ वाजता निघून दुसºया दिवशी पहाटे ४.४५ वाजता मंडुआडीह स्थानकात दाखल होईल. तिथून सकाळी ६.३० वाजता निघून दुसºया दिवशी ७.३० वाजता मुंबईत पोहोचेल.

विशेष शुल्क... विशेष गाडी- मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीत गाडी क्रमांक ०६०५१/०६०५२ चेन्नई सेंट्रल - अहमदनगर जंक्शन-चेन्नई सेंट्रल विशेष गाडी धावणार आहे़ या गाडीतून प्रवास करणाºया प्रत्येक प्रवाशांना विशेष शुल्क आकारले जाणार आहे़ ही गाडी चेन्नई सेंट्रल-पेनम्बुर-अरक्कोनम-रेनिगुंटा-कोडूरू-राजमपेटा-कडप्पा-येर्रगुन्तला-ताडपत्री-गोटे-गुंतकल जंक्शन-अदोनी-मंत्रालयम रोड अशी गाडी धावणार आहे.

कुर्डूवाडी-मिरज विभागातील  गेट क्रमांक ६२ कायमस्वरूपी बंद- मध्य रेल्वे, सोलापूर विभागावरील कुर्डूवाडी-मिरज सेक्शनदरम्यान रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ६२ हे २४ मार्चपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे़ तरी नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करून वाहतूक करावी, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे