शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

‘नीट’ परीक्षेचे आता सोलापुरात केंद्रास मान्यता , माहितीपत्रक जारी, लातूर, नांदेड, बीडमध्येही सेंटर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:29 PM

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाºया वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’ (एईईटी) परीक्षेचे केंद्र सोलापूरला मंजूर झाले असून यासंदर्भातील सूचना सीबीएसईच्या माहितीपत्रकात आज प्रसिद्ध झाली आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि बीड या शहरांमध्येही हे केंद्र मंजूरसोलापुरात केंद्र सुरू होण्यासाठी ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता, त्याला यश आले बॅचलर आॅफ मेडिसिन अ‍ॅन्ड बॅचलर आॅफ सर्जरी (एमबीबीएस) आणि बॅचलर आॅफ डेंटल सर्जरी (बीडीएस) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाºया वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’ (एईईटी) परीक्षेचे केंद्र सोलापूरला मंजूर झाले असून यासंदर्भातील सूचना सीबीएसईच्या माहितीपत्रकात आज प्रसिद्ध झाली आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि बीड या शहरांमध्येही हे केंद्र मंजूर झाले आहे. सोलापुरात केंद्र सुरू होण्यासाठी ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.बॅचलर आॅफ मेडिसिन अ‍ॅन्ड बॅचलर आॅफ सर्जरी (एमबीबीएस) आणि बॅचलर आॅफ डेंटल सर्जरी (बीडीएस) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा दरवर्षी देशभरातील १५० शहरांतील सुमारे २००० केंद्रांमधून घेतली जाते. सोलापुरातून दरवर्षी ३० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसतात; पण त्यांना परीक्षा देण्यासाठी पुणे, मुंबईची केंद्रे मिळतात. विद्यार्थी आणि पालकांसाठी दूरची केंद्रे सोयीची नसल्यामुळे सन २०१७ मध्ये ‘लोकमत’ने ही समस्या ठळकपणे मांडली होती. यंदा ‘नीट’ ६ मे रोजी होणार  आहे. गतवर्षी राज्यात ‘नीट’ परीक्षेची ९ केंद्रे होती. यंदा त्यामध्ये ८ नवीन केंद्रांची भर पडली आहे. सोलापूर आणि मराठवाड्यात परीक्षा केंद्राचे जाळे झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नजीकचे केंद्र निवडता येणार असून प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे त्यांना अभ्यासासाठी एक-दोन दिवस अधिक मिळणार आहेत.----------------------नीट परीक्षेची नवीन केंद्रेया परीक्षेसाठी मुंबईबरोबरच मुंबई उपनगर तसेच सोलापूरसह नांदेड, नाशिक, लातूर, जळगाव, बुलडाणा, बीड ही नवीन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्यात ९; तर आंध्र प्रदेशात ८ केंद्रे आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्य