शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

सोलापूर शहरात डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरी करणार, शहर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाचा निर्णय, शहर पोलीस आयुक्तालयातील बैठकीत रसुल पठाण यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:18 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिवजयंती महोत्सव सोलापूर शहरात वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे़ यंदा विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत़

ठळक मुद्देसोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात शिवजयंतीनिमित शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे : पोलीस आयुक्त महादेव तांबडेमिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढले जाईल. देखाव्यांची उंची मर्यादित असावी : पोलीस आयुक्त महादेव तांबडे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिवजयंती महोत्सव सोलापूर शहरात वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे़ यंदा विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत़ दरम्यान, डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरा करण्यावर भर देऊन एकाही मंडळावर गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर शहर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाचे अध्यक्ष व शाब्दी सोशल ग्रुपचे अध्यक्ष रसुल शेख यांनी दिली़सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात शिवजयंतीनिमित शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपआयुक्त अपर्णा गीते, सहायक पोलीस आयुक्तशर्मिष्ठा वालावलकर, सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. दीपाली काळे, मध्यवर्ती शिवजयंतीचे अध्यक्ष रसुल पठाण, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, दिलीप कोल्हे, दास शेळके, सुनील रसाळे, विजय पुकाळे, शाम कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.हवामान खात्याने काही अंदाज वर्तवले आहेत. वातावरणात बदलत आहे. पावसापासून मूर्ती व प्रतिमेची काळजी घ्यावी व अनधिकृत वीज जोडून घेऊ नये. शिवजयंती मिरवणुकीमध्ये डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले.विजय पुकाळे यांनी शिवाजी चौकात मिरवणुकीच्या दिवशी फेरीवाले व इतर लोकांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे बस स्टँडजवळ वाहतुकीची कोंडी होते. तेथील अतिक्रमण काढून रस्ता मोकाळा करावा, असे सांगितले.महानगरपालिकेने मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून मोठे स्पीडब्रेकर काढून घ्यावेत, तसेच धर्मादाय आयुक्त यांनी मागील वर्षाच्या हिशोबासाठी जास्त सक्ती करू नये, असे सुनील रसाळ यांनी बैठकीत सांगितले.  मंडळांनी मिरवणुकीचा खर्च वाचवून त्या खर्चामध्ये शालेय मुलांना शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले येथे सहली घडवाव्यात, असे महेश धाराशिवकर म्हणाले. ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच नवीन मंडळांना परवानगी द्यावी, असे दिलीप कोल्हे यांनी बैठकीत सांगितले. सहायक पोलीस आयुक्त वालावलकर यांनी उत्सवाच्या परवानगीसाठी आॅनलाईन अर्ज कसे भरावेत, याबाबत मंडळ आणि पदाधिकाºयांना माहिती दिली. तसेच आॅनलाईन अर्ज भरताना काही अडचणी असल्यास पोलीस उपनिरीक्षक कोकरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.पोलीस उपआयुक्त अपर्णा गीते यांनी मंडळांनी आॅनलाईन घेतलेल्या परवानगीची प्रत मोबाईलमध्ये ठेवावी व मागणी केल्यास ती पोलिसांना दाखवावी. मंडळामध्ये स्वयंसेवक नेमून त्यांची यादी पोलिसांना द्यावी. तसेच मिरवणुकीतील वाहनांची आरटीओकडून तपासणी करून घ्यावी आणि मंडप उभारण्यासाठी पोलीस ठाणे व वाहतूक शाखेचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.----------------------------देखाव्याची उंची...- न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढले जाईल. देखाव्यांची उंची मर्यादित असावी, असे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस