शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षिततेसाठी सोलापूर शहरातील प्रत्येक कॉलनीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांचे आवाहन, पोलीस खात्याकडून राबवणार विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:23 IST

शहर आणि परिसरात चोºया, दरोडे, चेन स्नॅचिंगसारख्या प्रकाराने डोके वर काढले आहे. यावर मात करण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाय म्हणून प्रत्येक कॉलनीमध्ये नागरिकांनी पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. यासाठी जनजागरण म्हणून पोलीस आयुक्तालयामार्फत बनवलेली शॉर्ट फिल्म कॉलनीमध्ये दाखवून नागरिकांमधून प्रबोधन करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली.

ठळक मुद्देसोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भुरट्या चोरट्यांनी उच्छांद मांडलाशहरातील काही कॉलनीमधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सीसीटीव्ही टीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेसुजाण नागरिकांनी यासाठी हातभार लावून आपल्या सुरक्षेसाठी सीसी टीव्ही बसवण्यासाठी पाऊल उचलावे, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : शहर आणि परिसरात चोºया, दरोडे, चेन स्नॅचिंगसारख्या प्रकाराने डोके वर काढले आहे. यावर मात करण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाय म्हणून प्रत्येक कॉलनीमध्ये नागरिकांनी पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. यासाठी जनजागरण म्हणून पोलीस आयुक्तालयामार्फत बनवलेली शॉर्ट फिल्म कॉलनीमध्ये दाखवून नागरिकांमधून प्रबोधन करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली.सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भुरट्या चोरट्यांनी उच्छांद मांडला आहे. बंद घर पाहून घर फोडण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून पोलीस खात्याने पेट्रोलिंग वाढवण्यावरही भर दिला आहे. यावरही मात करीत चोरट्यांचे चोºयांचे सत्र सुरूच आहे. पोलीस आपली जबाबदारी पार पाडत असताना यामध्ये नागरिकांचाही सहयोग महत्त्वाचा आहे. आपल्या परिसरात एखादी अनुचित घटना घडत असल्यास वा तसा संशय आल्यास तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याला कल्पना द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.शहरातील काही कॉलनीमधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सीसीटीव्ही टीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. पोलीस आयुक्तालयामार्फत अधिक प्रबोधन व्हावे, यासाठी पाच मिनिटांची शॉर्ट फिल्म बनवली आहे. यामध्ये सात ते आठ गुन्हे उघडकीस आलेल्या सत्य घटनांचा समावेश करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे हे गुन्हे उघडकीस आले आहेत. शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुख्य शहराशिवाय हद्दवाढ भागही विस्तारला आहे. अशावेळी केवळ पोलीस यंत्रणा चोºयांशिवाय अनुचित घटना टाळू शकत नाही. सुजाण नागरिकांनी यासाठी हातभार लावून आपल्या सुरक्षेसाठी सीसी टीव्ही बसवण्यासाठी पाऊल उचलावे, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.---------------------स्वत:च्या सुरक्षेसाठी पुढे या!- पोलीस खाते नेहमीच तुमच्या पाठीशी आहे, मात्र शहवासीयांनी आपल्या सुरक्षेसाठी आमच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा. कॉलनीतील नागरिकांनी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसवण्याचा उपक्रम हाती घ्यावा. अन्यत्र हवा तेवढा पैसा खर्च होत असताना लाखमोलाच्या आयुष्यासाठीही सामाजिक भान म्हणून सतर्क व्हावे, असे आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस