शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान; ‘इम्युनिटी बुस्टर’ औषधांचे साईड इफेक्टस् ठरताहेत त्रासदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:55 IST

डॉक्टरांचा सल्ला आवश्यक : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अनेक औषधे बाजारात दाखल

ठळक मुद्देविविध माध्यमांमधून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाºया जाहिराती प्रसिद्ध होत आहेतया जाहिरातीमध्ये प्रत्यक्ष कोरोनापासून बचाव करण्याचा दावा केला जातो कोरोना आजार पसरत असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला हवी या विचाराने लोक औषधे घेतात

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : कोरोना आजारापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची भूमिका बजावते, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदाची अनेक औषधे बाजारात नव्याने आली असून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेतल्याने शरीरातील उष्णता वाढून त्वचेवर पुरळ येणे, बेंड येणे तसेच अन्य त्रासदायक साईड इफेक्टला सामोरे जावे लागेल, असा इशारात तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

विविध माध्यमांमधून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाºया जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. या जाहिरातीमध्ये प्रत्यक्ष कोरोनापासून बचाव करण्याचा दावा केला जातो. कोरोना आजार पसरत असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला हवी या विचाराने लोक औषधे घेतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणे धोक्याचे ठरु शकते. खास कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती विशेष अशी औषधे असल्याचे संशोधन अद्याप तरी झालेले नाही.

आयुर्वेद तसेच अ‍ॅलोपॅथीमध्ये व्हिटॅमीन सी, झिंक यासारखी औषधे असतात. ही औषधे कधी घ्यावीत व किती प्रमाणात घ्यावीत हे तपासणीनंतरच कळू शकते. प्रत्येकाची उंची, वजन, वय यानुसार औषधांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. प्रत्येकाची मेडिकल हिस्ट्री देखील वेगवेगळी असते. त्यामुळे एकच औषध तितक्याच प्रमाणात सर्वच व्यक्तींना लागू पडते असे नाही. यासाठी तज्ज्ञांकडून तपासणी करुनच औषधे घ्यायला हवीत.

औषधं घ्यायची की नाही हे डॉक्टरांना ठरवू द्याकामामुळे बाहेर पडावे लागते. बाहेर जास्त वेळ थांबून काम करावे लागते. जास्त लोकांशी संपर्क येतो, म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी औषधांची जास्त गरज आहे, असे समजून अनेक लोक अशी औषधे घेतात. यामुळे उष्णता वाढणे, पुरळ येणे, बेंड होणे असे साईड इफेक्ट दिसायला लागू शकतात. आपल्याला कोणते औषध जास्त परिणामकारक व साईड इफेक्ट न करणारे आहेत हे पहावे लागते. त्यामुळे कोणते औषध घ्यायचे ते डॉक्टरांना ठरवू द्यायला हवे.

रोगप्रतिकारक शक्ती मोजण्याचे कोणतेही एकक सध्यातरी नाही. एखादे औषध घेण्याआधी तपासणी करणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषध विक्रीच्या दुकानातून औषधे घेणे टाळायला हवे. तसेच एखाद्याला दिलेले औषध दुसºयाला देणे अपायकारक ठरु शकते.- डॉ. अभिजित जगतापसार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयmedicineऔषधं