कीर्तनाला गर्दी जमविल्याप्रकरणी कलाकारासह ९ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:23 AM2021-07-31T04:23:47+5:302021-07-31T04:23:47+5:30

याबाबत नातेपुते पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिबंध असतानाही लोणंद-खताळवस्ती येथे तानाजी आबा खताळ यांच्या शेतात ...

A case has been registered against 9 persons including an artiste for gathering a crowd for kirtan | कीर्तनाला गर्दी जमविल्याप्रकरणी कलाकारासह ९ जणांवर गुन्हा दाखल

कीर्तनाला गर्दी जमविल्याप्रकरणी कलाकारासह ९ जणांवर गुन्हा दाखल

Next

याबाबत नातेपुते पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिबंध असतानाही लोणंद-खताळवस्ती येथे तानाजी आबा खताळ यांच्या शेतात बाळुमामाची मेंढरं बसवली आहेत. त्याठिकाणी मराठी वेब सिरीजमधील कलाकार ह.भ.प. भरत शिंदे ऊर्फ बाळासाहेब यांच्या कीर्तनाचे आयोजन राजेंद्र दगडू रूपनवर, संदीप राजेंद्र रूपनवर, रघुनाथ हिम्मत रूपनवर, बापूराव ब्रम्हचारी रूपनवर, दादा महादेव खताळ, किसन दशरथ होळ व दादासोा शंकर शेंडगे (रा. कन्हेर) यांनी ७०० ते ८०० लोकांची गर्दी जमविल्याचे निदर्शनास आल्यानंतर लोणंदचे तलाठी संजय गोरे यांनी नातेपुते पोलिसात फिर्याद दिली.

त्यानुसार स.पो.नि. मनोज सोनवलकर यांच्यासह पो.हे.काँ. हांगे, पोना माने, पोकाँ. जानकर , पोकाँ. घाडगे यांनी आयोजकांसह कलाकारांवर भादंवि कलम १८८, २६९, २७० (४) आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (४), साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम २,३४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये तानाजी आबा खताळ, राजेंद्र दगडू रूपनवर, संदीप राजेंद्र रूपनवर, रघुनाथ हिम्मत रूपनवर, बापूराव ब्रम्हचारी रूपनवर, दादा महादेव खताळ, किसन दशरथ होळ (रा. लोणंद), दादासोा शंकर शेंडगे (रा. कन्हेर, ता. माळशिरस) व भरत शिंदे ऊर्फ बाळासाहेब (रा. कांबळेश्वर, ता. बारामती, जि. पुणे) यांचा समावेश आहे.

Web Title: A case has been registered against 9 persons including an artiste for gathering a crowd for kirtan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.