शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांच्या सेवेसाठी सोलापूर आगाराचे चालक अन् वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 13:24 IST

मास्क अन् वर्दीची साथ; राजधानीत चालल्याचा आनंद

ठळक मुद्देमुंबईमध्ये सध्या लोकल सेवा बंद आहे. तेथे ‘बेस्ट’वर प्रवाशांचा ताण पडत आहेहा ताण कमी करण्यासाठी राज्यभरातील एक हजार एसटी गाड्या या मुंंबईकडे जात आहेतसोलापूर विभागातील ९ आगारातून १०० गाड्या पाठवून देण्याच्या सूचना

सोलापूर : मुंबईमध्ये सध्या लोकल सेवा बंद आहे. तेथे ‘बेस्ट’वर प्रवाशांचा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी राज्यभरातील एक हजार एसटी गाड्या या मुंंबईकडे जात आहेत. यासाठी सोलापूर विभागातील १०० गाड्यांसह कर्मचारी वर्गही सज्ज झाला आहे.सोलापूर विभागातील ९ आगारातून १०० गाड्या पाठवून देण्याच्या सूचना एसटी महामंडळाने केलेली आहे यामुळे सोलापुरातील काही गाड्या शनिवार आणि रविवारी मुंबई येथे दाखल झाल्या. 

मुंबईकरांना सेवा देण्यासाठी अहमदनगर, सातारा, सोलापूर, धुळे, रत्नागिरी, सांगली, बीड, कोल्हापूर या विभागातून प्रत्येकी १०० गाड्या पाठवण्यात येणार आहेत. या गाड्यांसोबत कर्मचारीही पाठवण्यात येत आहेत. 

या कर्मचाºयांची राहण्याची व्यवस्थाही तेथेच करण्यात आलेली आहे यामुळे कर्मचारीही तयारीनेच मुंबईत दाखल झाले आहेत. एका गाडीसोबत दोन चालक, दोन वाहक ही गेलेले आहेत. सोबतच मेकॅनिकची टीम आहे. बेस्टची सेवा बेस्ट करण्याचा निर्धार चालक, वाहकांनी केला आहे. 

मुंबईकरांच्या सेवेसाठी जात असल्याचा आनंदकोरोनाची सध्या जास्त भीती मनात आहे; पण तरीही मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही जात असल्याचा जास्त आनंद आहे. यासाठी आम्ही पुढील आठ दिवसांची तयारीही केली आहे. घरून जाताना मास्क आणि सॅनिटायझर आम्ही घेतलेले आहे, असे मत चालक अमर भोसले यांनी व्यक्त केले.

मुंबईमध्ये किती दिवस लागतील हे माहीत नाही; पण आम्ही जाताना फक्त वर्दी घेतलेली आहे. दोन दिवस टिकेल अशी भाकरी, पिठलं असे पदार्थ घेतले आहेत. कोरोनामुळे सुरक्षेच्या साहित्याला प्राधान्याने घेतले आहे.-गौरीशंकर चिलगुंडे, चालक

टॅग्स :SolapurसोलापूरST Strikeएसटी संपMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याBESTबेस्ट