शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सावधान; हेल्मेटशिवाय आरटीओ कार्यालयात दुचाकीस्वारांना प्रवेश नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:48 IST

आजपासून मोहिम; सकाळच्या सत्रात झाली दुचाकीस्वारांवर कारवाई

ठळक मुद्देकायद्याने स्वयंचलीत दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती आहेच. पण याबाबत नागरिकांना गांभीर्य दिसत नाहीआता आरटीओ कार्यालयापासूनच ही शिस्त राबविण्याचा निर्णय घेतला आरटीओ कार्यालयाकडे जात असतानाच हेल्मेटबाबत खातरजमा करा, अन्यथा मोठा दंड होऊ शकतो

सोलापूर : आरटीओ कार्यालयात कामानिमित्त मोटरसायकलवर जातायं. सावधान... आता आरटीओ कार्यालयात हेल्मेटशिवाय मोटरसायकलस्वारांना प्रवेश नाही. सोमवारपासून ही बंदी लागू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी २४ जणांना दणका बसला आहे. 

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी याबाबत शुक्रवारीच फतवा काढला आहे. सोमवारपासून आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणाºयांना हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. यानुसार सकाळी ९. १५ वा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डोळे प्रवेशद्वारावर येऊन थांबले. इतर अधिकारी थोड्याच वेळात दाखल झाल्यावर पावणेदहा वाजेपासून अचानकपणे कारवाई सुरू करण्यात आली. प्रवेशद्वारातून आत येणाºया विनाहेल्मेट मोटरसायकलस्वारांना पकडण्यात आले. दुपारी बारा वाजेपर्यंत २४ दुचाकीस्वार विनाहेल्मेट आढळले. त्यांची वाहने ताब्यात घेऊन मेमो देण्यात आला. कागदपत्रांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दंड भरल्यानंतर हेल्मेट दाखविल्यावर ही वाहने सोडण्यात येणार आहेत. 

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व दुचाकीस्वाराच्या सुरक्षिततेसाठी शासनाने हेल्मेट सक्ती केली आहे. पण वाहतूक पोलीस व आरटीओ विभागातर्फे वारंवार मोहीम घेऊनही नागरिक याबाबत सतर्क दिसत  नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हाधिकाºयांत येणाºयां दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटची सक्ती केली होती. पण हा प्रयोग फार काळ टिकला नाही. त्याचबरोबर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी विनाहेल्मेट दुचाकीवर जाणाºया पोलिसांचे फोटो व्हॉटसपवर पाठवा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे जाहीर केले होते. याबाबत वाहतूक शाखेतर्फे व्हाटसप नंबरही प्रसिद्ध केले होते. पण ही मोहीमही थंड पडल्याची चर्चा असतानाच आता आरटीओ कार्यालयाने हेल्मेट सक्की लागू केली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाकडे जात असतानाच हेल्मेटबाबत खातरजमा करा, अन्यथा मोठा दंड होऊ शकतो.---------कायद्याने स्वयंचलीत दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती आहेच. पण याबाबत नागरिकांना गांभीर्य दिसत नाही. आरटीओ व वाहतूक पोलिसांतर्फे मोहीम घेण्यात येत आहेत. सध्या नवीन अधिकारी प्रशिक्षणासाठी गेले असल्याने अडचण येत आहे. पण आता आरटीओ कार्यालयापासूनच ही शिस्त राबविण्याचा निर्णय घेतला आहे. संजय डोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीस