शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने कार उलटली, पोलिस हवालदार जागीच ठार; चिमुकल्यासह तिघे जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:25 IST

हवालदार महादेव सोनावणे हे मुंबई नागपाडा पोलिस स्टेशनला एसीबी इन्चार्ज म्हणून कर्तव्यास होते.

सांगोला : पंढरपूर येथून देवदर्शन आटपून भरधाव वेगाने जाणारी कार खड्ड्यात आदळून टायर फुटून उलटली. या अपघातात पोलिस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला, तर एका चिमुकल्यासह तिघे जण जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी ४:३० च्या सुमारास कोळे - पाचेगाव बु. रोडवर घडला.

महादेव अश्रुबा सोनावणे (वय ५३, सध्या रा. नागपाडा- मुंबई, मूळ रा. चिंचपूर -ई ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे हवालदाराचेनाव आहे. पत्नी जनाबाई महादेव सोनावणे (वय ४५, रा. चिंचपूर -ई, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), वर्षा अरविंद दराडे (वय २६) व दक्ष अरविंद दराडे (वय ७ महिने, दोघेही रा. राशी, जि. अहिल्यानगर) अशी जखमींची नावे आहेत.

हवालदार महादेव सोनावणे हे मुंबई नागपाडा पोलिस स्टेशनला एसीबी इन्चार्ज म्हणून कर्तव्यास होते. ते पत्नी जनाबाई, मुलगी वर्षा दराडे, नातू दक्ष दराडे, तसेच अंकुश महाजन असे सर्व जण नातेवाईक मिळून एमएच ०३ ईएफ २४०१ इको कारमधून गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर देवदर्शन करून रविवारी आटपाडी (जि. सांगली) मार्गे विट्यातील मुंबईला जाणार होते. मित्राचा पाहुणचार घेतलाआटपाडीत आल्यानंतर त्यांनी जुनोनीतील पोलिस मित्राला फोन करून परत नाझरे मठमार्गे जुनोनीला गेले. त्या ठिकाणी मित्राचा पाहुणचार घेऊन जुनोनी, कोळे भिवघाटमार्गे विट्याकडे निघाले होते. वाटेत पाचेगाव बु जवळ कार खड्यात आदळून टायर फुटल्याने हा अपघात घडला. अपघातात कारने दोन वेळा पलटी मारल्याने कारच्या खाली सापडून महादेव सोनावणे यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सोनावणे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी पाठविण्यात आला.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी