शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरच्या आषाढी वारीत ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 15:00 IST

सोलापूर : पंढरपूर ला येणारे पालखी सोहळे किंवा आषाढी वारीतील गर्दीचे ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई जाहीर केली आहे. पंढरपुरात आषाढीवारीचा सोहळा १३ ते २८ जुलै या कालावधीत  भरणार आहे. यासाठी पंढरपुरात सुमारे १० ते १२ लाख वारकरी भाविक दाखल होतात. पालखी मार्ग व पंढरपुरात आषाढी वारी सोहळ्याची होणारी ...

ठळक मुद्देपंढरपुरात आषाढीवारीचा सोहळा १३ ते २८ जुलै या कालावधीत  भरणार जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई

सोलापूर : पंढरपूरला येणारे पालखी सोहळे किंवा आषाढी वारीतील गर्दीचे ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई जाहीर केली आहे. 

पंढरपुरात आषाढीवारीचा सोहळा १३ ते २८ जुलै या कालावधीत  भरणार आहे. यासाठी पंढरपुरात सुमारे १० ते १२ लाख वारकरी भाविक दाखल होतात. पालखी मार्ग व पंढरपुरात आषाढी वारी सोहळ्याची होणारी गर्दी लक्षात घेऊन अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये वरील कालावधीत पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर आणि पंढरपूर आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घातली आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानदेव महाराज, श्री संत नामदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई व संत श्री गजानन महाराज या मानाच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत. 

 विशेषत: वेगवेगळ्या नदी घाटावर सोलापूर जिल्ह्यातून येणाºया सर्व पालखी मार्गांवर बरेच टी.व्ही. चॅनल्स, खासगी व्यक्ती, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण होऊन त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय गोंधळ उडून चेंगराचेंगरीसारखा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. हे आदेश सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) व सर्व नगरपालिका हद्दीत लागू करण्यात आले असल्याचे अपर जिल्हा दंडाधिकारी तेली यांनी आदेशात नमूद केले आहे.

मनाई आदेश लागू सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) २६ जून २०१८ पासून पुढील १५ दिवस आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

ज्या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी पूर्वपरवानगी दिली आहे, अशा यात्रास्थळ व तत्सम प्रकरणासाठी हा आदेश लागू राहणार नाही, असे अपर जिल्हा दंडाधिकारी तेली यांनी आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरSolapurसोलापूर