श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासास तडा जावू न देता विश्वासार्हता आजच्या वजनकाटा तपासणीने कायम ठेवली आहे. वैद्यमापन पथकाने कारखान्याकडील चारही काट्याची तपासणी करत एकच वाहन चारही काट्यावर फिरवून वजन केले. त्यामध्ये कोणताही फरक आढळून आला नाही. यानंतर काट्यावर २० किलोची प्रमाणित ५ टन वजने ठेवून प्रत्यक्ष वजन केले असता त्यामध्येही वजनात कोणताही फरक आढळून आला नाही.
वैद्यमापन तपासणी पथकामध्ये पुरवठा निरीक्षक सी. बी. लोखंडे, वजनमापे निरीक्षक आर. बी. बंडापल्ले, लेखापरिक्षक पी. आर. शिंदे, पोलिस नाईक एस. एच. कोळी यांच्यासह शेतकरी भिकू सदाशिव पाटील व मारुती संभाजी गाडवे, कारखान्याचे चीफ अकौंटंट आर. एम. काकडे, एच. एस. नागणे, टी. एस. भोसले, जी. एम. बागल आदी उपस्थित होते.
कोट ::::::::::::::::::::
पांडुरंग कारखान्यावर गेल्या २५ वर्षापासून ऊस उत्पादकांनी दाखविलेली विश्वासाहर्ता आजही काटा तपासणीने पुन्हा एकदा सिध्द केली आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित तसेच पांडुरंग कारखान्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देणारा कारखाना म्हणून नाव लौकीक मिळविला आहे.
- डॉ. यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक