शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

आबुटे व डोंगरे यांची उमेदवारी

By admin | Updated: September 3, 2014 00:44 IST

महापौर-उपमहापौरपद : विरोधकांतर्फे गदवालकर व चव्हाण यांचे अर्ज

सोलापूर : महापौर पदासाठी काँग्रेसकडून सुशीला आबुटे तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण डोंगरे यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी दाखल केली आहे. दोन्ही पक्षांच्या स्थानिक पक्षश्रेष्ठींनी नावांची घोषणा केल्यावर दोघांनी दुपारी सव्वाबारा वाजता नगरसचिव ए. ए. पठाण यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपा—सेना युतीनेही दोन्ही पदांसाठी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. काँग्रेसतर्फे महापौर पदाचा उमेदवार कोण याची बरीच उत्सुकता होती. दुपारी बारा वाजता शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर महापालिकेत आले व त्यांनी बैठक घेतली. बैठकीत पक्ष प्रमुखांकडून फॅक्स आल्यावर नावांची घोषणा केली जाईल असे सांगितले. काँग्रेसतर्फे आबुटे व श्रीदेवी फुलारे यांचे समर्थक उत्सुकतेने आले होते. बारा वाजेच्या सुमाराला आबुटे व डोंगरे यांच्या नावांची घोषणा दोन्ही पक्ष प्रमुखांनी केली. त्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी सभागृह नेते संजय हेमगड्डी, शिवलिंग कांबळे, पैगंबर शेख, देवेंद्र भंडारे, चेतन नरोटे, कुमुद अंकाराम, मंदाकिनी तोडकरी, सुधीर खरटमल, हेमा चिंचोळकर यांच्यासह काँग्रेसचे जवळ जवळ २५ नगरसेवक तर डोंगरे यांच्याबरोबर हारून सय्यद, दिलीप कोल्हे, नाना काळे, इब्राहिम कुरेशी, खैरूनिस्सा शेख, सुनीता रोटे, गीता मामड्याल, किशोर माडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीतर्फे नगरसेविका बिस्मिल्ला शिकलगार उपमहापौर पदासाठी उत्सुक होत्या. डोंगरे यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. १५ वर्षे मी नगरसेविका आहे, भविष्यात संधी मिळेल की नाही सांगता येणार नाही, पण पक्ष प्रमुखांनी मला न्याय द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.----------------------------युतीत एकमत नाहीभाजपा—सेना युतीतर्फे महापौर पदासाठी भाजपाच्या नरसूबाई गदवालकर तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या मेनका चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली. तत्पूर्वी प्रभारी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी यांनी नगरसेवकांची बैठक घेतली. सुरेश पाटील, मोहिनी पत्की, रोहिणी तडवळकर, नागेश वल्याळ, जगदीश पाटील यांनी बैठकीला शहराध्यक्ष नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. या पदांच्या निवडीसाठी व्यूहरचना तयार करण्यासाठी आ. विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घ्यायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त होत होती. या दोन्ही पदांबाबत युतीत एकमत नसल्याचे स्पष्ट झाले. सेनेचे गटनेते भीमाशंकर म्हेत्रे बैठकीला हजर होते पण पदाधिकारी कोणी आले नाहीत. -----------------------------६ रोजी होणार निवडमहापौरपदासाठी काँग्रेसतर्फे आबुटे, भाजपातर्फे गदवालकर तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीतर्फे डोंगरे, सेनेतर्फे चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्व पक्षांनी आपापल्या नगरसेवकांना व्हीप दिला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले महेश कोठे यांनी काही खेळी करू नये म्हणून सावधगिरी बाळगण्यात येत आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या बैठकीला कोठे किंवा सेनेचे पदाधिकारी नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कोठे आमच्याबरोबर होते अशी माहिती शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिली. महापौर राठोड तर उपमहापौर सय्यद यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल ५ सप्टेंबर रोजी संपत आहे. दोन्ही पदाच्या निवडीसाठी ६ सप्टेंबरला सकाळी ११ वा. महापालिकेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक बोलाविण्यात आली आहे.---------------------------------महापालिकेत सत्तांतर करणार म्हणून महेश कोठे शिवसेनेत आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षप्रमुखांनी समन्वयाची बैठक घ्यायला हवी होती. इच्छुक उमेदवार पक्षप्रमुखांकडे गेले तरी त्यांची दखल घेण्यात आली नाही. चमत्कार दाखविण्याची ही वेळ आहे. - सुरेश पाटील नगरसेवक, भाजपा