उजनीतून २० मार्चला सोडलेले कालव्याचे पाणी २० मे पर्यंत वाहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:23 AM2021-05-07T04:23:27+5:302021-05-07T04:23:27+5:30

भीमानगर : उजनी धरणातून २० मार्चपासून कालवा नदीला सोडण्यात आलेले पाणी हे २० मे पर्यंत वाहत राहणार आहे. सद्य ...

The canal water released from Ujani on March 20 will flow till May 20 | उजनीतून २० मार्चला सोडलेले कालव्याचे पाणी २० मे पर्यंत वाहणार

उजनीतून २० मार्चला सोडलेले कालव्याचे पाणी २० मे पर्यंत वाहणार

Next

भीमानगर : उजनी धरणातून २० मार्चपासून कालवा नदीला सोडण्यात आलेले पाणी हे २० मे पर्यंत वाहत राहणार आहे. सद्य परिस्थितीत उजनी धरणातील पाण्याचा साठा कालव्याच्या दरवाज्याच्या तळातील पातळीपर्यंत जाईपर्यंत कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी ६०० क्युसेक्स पाणी सध्या कालव्यातून सीना नदीत सोडण्यात येत आहे. १० किंवा ११ मे पर्यंत धरणाची पाणी पातळी मायनस (उणे) मध्ये जाणार आहे. तरीदेखील कालव्यातून पाणी सोडणे बंद होणार नसल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

उजनी धरणात ४९१ मीटर उंच पाणी पातळीच्यापुढे धरण प्लस मध्ये गृहीत धरले जाते. त्यामुळे हा जिवंत पाणीसाठा संबोधला जातो. तर ४९१ मीटरच्या खाली मात्र मायनस मृतसाठा संबोधला जातो. धरणाच्या भिंतीत असलेल्या मुख्य कालव्याच्या दरवाजाची तळ पातळी ४८७. २०० मीटर पर्यंत आहे. परंतु ४८८ नंतर पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे कालव्यातून पाणी पुढे जात नाही.

२० मार्च रोजी कालव्यातून ३०० क्युसेक्सने उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. त्यावेळी धरणातील पाण्याची पातळी ६४ टक्के होती. ६ मे रोजी ती सहा टक्के आहे. ४८७ .५०० मीटर पातळीपर्यंत कालवा चालू ठेवण्यात येणार असल्यामुळे अंदाजे २० ते २२ मे पर्यंत हे पाणी कालव्यातून वाहत राहील. तोपर्यंत धरणातील पाण्याची पातळी मायनस १४ टक्के ते १५ टक्के पर्यंत निश्चित जाणार आहे. त्यानंतर कालव्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण क्षेत्राला पावसाच्या पाण्याची वाट पहावी लागणार आहे,

सध्य दक्षिण सोलापूर साठी कालव्यातून कुरुल हद्दीतील एस्केएफ् मधून ४५० क्युसेक्स पाणी सीना नदीत सोडले जात आहे. शिरापूर योजना सध्या बंद झाली असल्याने तिकडील १५० क्युसेक्स पाणी येत आहे. अशा प्रकारे एकूण ६०० क्युसेक्स पाणी दक्षिण सोलापूरसाठी सोडले जात आहे.

--

सीना, माढा व दहीगाव सिंचन योजना

लवकरच बंद होणार

सध्या धरणात ४९१. ६९० मीटरपर्यंत पाणी पातळी आहे. ४९१.२०० मीटर पाणीपातळीला सीना माढा सिंचन योजना बंद केली जाते. सध्या सीना माढा सिंचन योजनेसाठी २२५ ते २३५ क्युसेक्सचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे आगामी आठ दिवसात सीना माढा व दहीगाव सिंचन योजना बंद होणार आहे. पावसाळ्या नंतर धरणातील पाणी वाढल्यानंतर या योजना चालू होणार हे निश्चित.

---

बाष्पी भवनामुळे पाणी झाले कमी

२० मार्च रोजी उजनीची टक्केवारी ६१. ६९ टक्के होती. ६ मे ला ६ टक्के आहे. म्हणजेच २० मार्चला उजनीतून कालवा नदी व ईतर योजनांना सोडण्यात आलेल्या उन्हाळी आवर्तनात ४५ दिवसात जवळपास ५५ टक्के पाणी आतापर्यंत उन्हाळी आवर्तनातमुळे व बाष्पीभवनामुळे कमी झाले आहे.

--

६ मे रोजीची धरणाची स्थिती

पाणी पातळी ४९१. ५०० मीटर

एकूण साठा १९१०.०१ दशलक्ष घनमीटर

विसर्ग : ६ टक्के

कालवा ३१५० क्युसेक्स,

बोगदा ६९० क्युसेक्स,

सीना-माढा २९६ क्युसेक्स

दहीगाव ८५ क्युसेक्स

बाष्पीभवन ७. ५५ मिलिमीटर.

Web Title: The canal water released from Ujani on March 20 will flow till May 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.