शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दुष्काळाविरुद्ध चळवळीसाठी कामाला लागा, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 13:10 IST

श्रमदानाचा टप्पा पूर्ण केलेल्या गावांना भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत जेसीबी/पोकलेन पुरविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत जेसीबी/पोकलेनगावात श्रमदान करणाºयांची संख्या वाढली लोकांनी पाणी फाउंडेशनच्या जलमित्र योजनेत सहभागी व्हावे

सोलापूर : दुष्काळाविरुद्ध लढण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एकेक गावे पेटून उठलेली आहेत. पाण्याच्या प्रश्नावर गावागावात राजकारण होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. दुष्काळावर मात करण्याची ही एक संधी आहे. येत्या महिनाभरात जिल्ह्यात चळवळ उभी राहील, यासाठी कामाला लागा, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी सकाळी पाणी फाउंडेशनच्या कामासंदर्भात सांगोला, करमाळा, उत्तर सोलापूर, बार्शी, माढा आणि मंगळवेढा तालुक्यांमधील तहसीलदार, कृषी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, बीजेएसचे कार्यकर्ते आणि तालुका प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष केतन शहा, शैलेश मंगळवेढेकर, श्याम पाटील, प्रवीण बलदोटा, अजित कुंकूलोळ, विशाल मेहता, राहुल शहा, कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, पाणी फाउंडेशनचे समन्वयक आबा लाड, कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर आदी उपस्थित होते. शांतीलाल मुथ्था म्हणाले, श्रमदानाचा टप्पा पूर्ण केलेल्या गावांना भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत जेसीबी/पोकलेन पुरविण्यात येत आहे. २०१३ पासून महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. भारतीय जैैन संघटना आपत्तीला मुळापासून बाहेर काढण्यासाठी काम करीत आहे. पाणी फाउंडेशनचे काम सुरू केल्यानंतर आम्ही त्याच्याशी जोडले गेलो. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत खेडी घडविण्याचे काम आमीर खानने सुरू केले आहे. आज अनेक गावात श्रमदान करणाºयांची संख्या वाढली आहे. लोक श्रमदानावर जोर देत असल्याने लवकर मशीन मागायला येत नाहीत. त्यामुळे आमचे कार्यकर्ते नाराज होत आहेत, परंतु लोक पेटून उठलेत हे खूप महत्त्वाचे आहे. शहरातील लोकांनी पाणी फाउंडेशनच्या जलमित्र योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. दुष्काळ हटविण्यासाठी जैन संघटना पुढील सहा महिन्यांत आणखी १५० जेसीबी खरेदी करणार आहे. त्या मराठवाड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावेळी राहुल शहा, विशाल मेहता, अजित कुंकूलोळ, प्रवीण बलदोटा, शाम पाटील, शैलेश मंगळवेढेकर, अभिनंदन विभूते, संतोष पंडित, राहुल धोका, देशभूषण म्हसाळे, आनंद तालिकोटी, कोमल पाचोरे, हेमंत पलसे, रूपेश देवधरे, माया पाटील, पंकजा पंडित, प्रीती श्रीराम, कामिनी गांधी, महेश कोकीळ, महेश कोठारी, महेश बाफना, शिवाजी खताळ तसेच भारतीय जैन संघटनेचे तालुका प्रतिनिधी शैलेश नांदे, विजय खरात, परमेश्वर ससाणे, प्रल्हाद वाघ, विजय लवांडे, शिवाजी खताळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुवर्णा कटारे यांनी केले. विभागीय अध्यक्ष शाम पाटील यांनी आभार मानले.शांतीलालभाई म्हणजे गृहस्थाश्रमातील संन्याशी - सीईओ डॉ. भारुड यांनी जैन संघटनेच्या विविध कामांची माहिती दिली. शांतीलाल मुथ्था हे गृहस्थाश्रमामध्ये राहून मानवासाठी काम करणारे खरे संन्याशी आहेत. शांतीलालभाई आणि त्यांची संघटना मानवी सॉफ्टवेअरसाठी काम करीत आहेत. मूल्य शिक्षणासाठी त्यांनी केलेले काम खूप महत्त्वपूर्ण आहे. - भारतीय जैन संघटना (बीजेएस) ३२ वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभागी असून, पाच वर्षांपासून महाराष्टÑ दुष्काळमुक्त अभियानात कार्यरत आहे. या वर्षी महाराष्टÑातील ७५ तालुक्यांमधील ३००० गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे. या अभियानांतर्गत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था यांनी महाराष्टÑ दौरा आयोजित केला आहे.या विषयांवर चर्चा - वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमधील ग्रामस्थांचा श्रमदानाचा वेग कसा वाढू शकेल, शासनाच्या निर्णयाप्रमाणे श्रमदान करणाºया गावांना डिझेल पुरविण्याची प्रक्रिया सोपी कशी होईल, तोपर्यंत ग्रामस्थ लोकवर्गणीतून डिझेल भरण्याची व्यवस्था कशी करतील, या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद