शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वाढदिवस रस्त्यावर साजरा केल्यास लॉकअपमध्ये कापावा लागेल केक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:31 IST

सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोहीम; माहिती कळताच घटनास्थळी येऊन पोलीस दाखल करणार गुन्हे

ठळक मुद्देमोठी गर्दी जमवून गोंधळ करीत होणाºया या वाढदिवसाच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या वतीने मोहीम सुरूवाढदिवस साजरा करताना तलवार, चाकूसारखे शस्त्र वापरल्यास भारतीय दंड विधान कलम ३४१, १४३ मुंबई पोलीस कायदा १३५ व ११०/११७ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतोगुन्हे शाखेच्या या मोहिमेत कॉलेजचे विद्यार्थी जर सापडले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन भवितव्य खराब होऊ शकते

सोलापूर : रात्री बारानंतर सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना आढळून आल्यास, ‘बर्थ डे बॉय’ना त्यांचा केक लॉकअपमध्ये खावा लागणार आहे. माहिती कळताच गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी येऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करणार आहेत. या मोहिमेसाठी गुन्हे शाखेचे पोलीस दररोज शहरातून गस्त घालत आहेत. 

गल्लीबोळात व सार्वजनिक रस्त्यावर एखाद्या मुलाचा, नेत्याचा किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या सर्वत्र सुरू आहे. रस्त्याच्या कडेला वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी उभे राहून मोटरसायकल, कारवर केक कापला जातो. केक कापण्यासाठी तलवार, चाकू आदी धारदार शस्त्राचा वापर केला जातो. मोबाईलवर गाणी लावून सार्वजनिक शांततेचा भंग केला जातो. फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला जातो. अशा प्रकारचा विचित्र प्रकार शहरात ठिकठिकाणी पाहावयास मिळतो. केक कापून आवाज करणे, गोंधळ घालणे आदी प्रकार सर्रास घडतात. या प्रकारामुळे नियमांचा भंग तर होतोच; मात्र आजूबाजूच्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. 

मोठी गर्दी जमवून गोंधळ करीत होणाºया या वाढदिवसाच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या वतीने मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाढदिवस साजरा करताना तलवार, चाकूसारखे शस्त्र वापरल्यास भारतीय दंड विधान कलम ३४१, १४३ मुंबई पोलीस कायदा १३५ व ११०/११७ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. गुन्हे शाखेच्या या मोहिमेत कॉलेजचे विद्यार्थी जर सापडले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन भवितव्य खराब होऊ शकते. विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी रस्त्यावर वाढदिवस साजरा न करता तो घरात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये साजरा करावा. अन्यथा कारवाई अटळ आहे असे आवाहन गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. 

माहिती सांगणाºयाचे नाव गोपनीय ठेवले जाईल : अभय डोंगरेपोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशावरून ही मोहीम राबविली जात आहे. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील तर त्यांना जॉबसाठी परदेशात जाण्यासाठी अडचणी येतात. पुढे नोकरीला अडचणी येऊ शकतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वत:ची  व आई-वडिलांची नाचक्की होते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी तरुणांनी नियमांचे पालन करावे. शहरात जर असा प्रकार घडत असेल तर, पाहणाºया व त्रास होणाºया लोकांनी याला आळा घालण्यासाठी ७५0७१३३१00 या माझ्या खासगी मोबाईलवर संपर्क साधावा.  मेसेज करावा वाढदिवसाची माहिती सांगणाºयाचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस