वाघोलीत सराफाचे घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:47+5:302021-04-09T04:23:47+5:30

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भीमाशंकर पोतदार (रा.डोणज, ता.मंगळवेढा, सध्या रा. वाघोली ता. मोहोळ) यांचे वाघोली येथे सोन्याचे दुकान आहे. ...

The bullion house was broken into in Wagholi | वाघोलीत सराफाचे घर फोडले

वाघोलीत सराफाचे घर फोडले

Next

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भीमाशंकर पोतदार (रा.डोणज, ता.मंगळवेढा, सध्या रा. वाघोली ता. मोहोळ) यांचे वाघोली येथे सोन्याचे दुकान आहे. पोतदार यांनी ७ रोजी दुकानातील काम संपवून ड्राव्हरमध्ये सोन्याचे दागिने ठेवून दुकान बंद केले होते. दुसऱ्या दिवशी ८ रोजी पहाटे मित्रांबरोबर व्यायामाला जाताना सोन्याच्या दुकानाचे दार उघड दिसले. दुकानात प्रवेश केला असता दुकानाचे कुलूप व ड्राव्हर तोडून त्यामधून १३० ग्रॅम वजनाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.

दुसरीकडे गावातील सुधीर होनराव यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून १० ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला होता. याची माहिती कामती पोलीस ठाण्यास कळवतास सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने, बबलू नाईकवाडी, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन जाधवर, नागराज कुंभार, अमोल नायकोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

गुन्ह्याचे स्वरूप पाहता सहा. पोलीस निरीक्षक माने यांनी या ठिकाणी श्वानपथक व ठसे पथकाला पाचारण केले. श्वान हे गावाच्या पांद रस्त्याने पळत सुटले. पुढे गावाच्या गायरानात असणाऱ्या मंगळवेढा-सोलापूर डांबरी रस्त्यावरुन वाघोलीच्या मुख्य चौकात येऊन गुटमळले. ठसे घेणाऱ्या पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणचे ठसे घेतले आहेत.

भिमाशंकर पोतदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सराफ दुकानातील ५ लाख २० हजार रुपये किंमतीचे एकूण १३० ग्रॅम सोने व गावातील सुधीर होनराव यांच्या घरातील ४० हजार किंमतीचे १० ग्रॅम सोने व रोख ८ हजार रुपये असे एकूण ५ लाख ६८ हजार रुपयांची चोरी अज्ञात चोरट्याने केली. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने हे करीत आहेत.

फाेटो

०८कामती-क्राईम

वाघोली येथे सराफाचे घडल्याचे दिसत आहे.

०८कामती-क्राईम

चाेरटे ज्या वाटेल गेले तेथे काही दिसल्यानंतर त्याची पाहणी करताना सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने व अन्य.

Web Title: The bullion house was broken into in Wagholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.