शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिकेसाठी दोनशे कोटी आणा, अन्यथा लोकसभेला खरं नाही : भाजप नगरसेवकांचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 12:10 IST

सोलापूर : महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे नगरसेवकांना शहर विकासासाठी निधी मिळत नाही. राज्य शासनाने खास बाब म्हणून ...

ठळक मुद्देदोन देशमुख आणि भाजपा शहराध्यक्षांना दिले पत्र राज्य शासनाने खास बाब म्हणून महापालिकेला २०० कोटी द्यावेत - नगरसेवकहा निधी मिळाला नाही तर लोकसभेला जनतेचा रोष ओढावेल - नगरसेवक

सोलापूर : महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे नगरसेवकांना शहर विकासासाठी निधी मिळत नाही. राज्य शासनाने खास बाब म्हणून महापालिकेला २०० कोटी द्यावेत, अशी मागणी महापालिकेचे सभागृहनेते संजय कोळी यांच्यासह भाजपा नगरसेवकांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदन पाठवून केली आहे. 

हा निधी मिळाला नाही तर लोकसभेला जनतेचा रोष ओढावेल. आपलं काही खरं नाही, असा इशाराही दोन देशमुख आणि भाजपा शहराध्यक्षांना स्वतंत्रपणे दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. 

शहरातील विकासकामांसाठी मंजूर अंदाजपत्रकातील भांडवली निधी द्यावा, या मागणीसाठी भाजपा नगरसेवक आणि महापालिका आयुक्तांची गुुरुवारी समन्वय बैठक झाली. महापालिकेची आर्थिक नाजूक असल्याने यावर्षी भांडवली निधी मिळणार नाही. शासनाकडे पाठपुरावा करा आणि विशेष पॅकेज आणा, असा सल्लाही आयुक्तांनी दिला.

 त्यानुसार आज सभागृहनेते संजय कोळी यांनी निवेदन तयार केले. त्यावर नगरसेवकांच्या सह्या घेण्याचे काम दिवसभर सुरू होते. काही नगरसेवक या निवेदनावर सह्या करायला तयार नव्हते. महापालिकेचे उत्पन्न वाढविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आपण त्यांना मदत करु. पण आयुक्त सांगतात म्हणून आपण शासनाकडे जायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शहरातील मेजर व मिनी गाळ्यांचा प्रश्न सुटलेला नाही.

मोठे थकबाकीदार कर भरायला तयार नाहीत. जीएसटीचे अनुदान कमी मिळत आहे. यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही जीएसटी अनुदानातील थकबाकीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शहर विकासाला निधी मिळालेला नाही. आयुक्तांनी भांडवली निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्य शासनाने खास बाब म्हणून २०० कोटी द्यावेत. 

लोकांचा रोष वाढेल.. पक्षाला फटका बसेल- नगरसेवकांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांना स्वतंत्र निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, दोन ते चार महिन्यांत लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होणार आहे. नगरसेवकांना निधी न मिळाल्याने शहरात मूलभूत विकास होत नाही. लोकांचा रोष वाढेल. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला त्याचा फटका बसेल. याचा गांभीर्याने विचार करुन आपण वरिष्ठ स्तरावर २०० कोटी रुपये आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी