शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

आठवणींना उजाळा; कुर्डूवाडी जंक्शनला चारवेळा लाभला बाबासाहेबांचा पदस्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 17:10 IST

माढा, मोडनिंब व बावीलाही दिल्या भेटी

कुर्डूवाडी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९३७ ते १९४१च्या दरम्यान एकूण चार वेळा कुर्डूवाडी रेल्वे जंक्शनमुळे शहराला वेगवेगळ्या कामानिमित्ताने भेटी दिल्या. त्यात एका भेटीदरम्यान तर त्यावेळच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने आमदारकी लढवत असलेल्या जिवाप्पा ऐदाळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने याबरोबरच कुर्डूवाडीशिवाय माढा, मोडनिंब व बावी या गावालादेखील त्यांचा पदस्पर्श झालेला आहे. त्यांच्या आठवणी आजही ऊर्जा देणाऱ्या ठरतात असे मत इतिहास संशोधक प्रा. डॉ. आशिष रजपूत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

 प्रा. डॉ आशिष रजपूत यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ३१ डिसेंबर १९३७ साली पंढरपूर येथील दलित परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भल्या पहाटे ५ वाजताच ऐन थंडीत कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. त्यावेळी माढा तालुक्यातील अनुयायांनी फलाट तिकिटाविना मोठी गर्दी रेल्वे स्थानकावर केली होती.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दंडाची रक्कम जमा करण्यास सांगितले. काही वेळाने बाबासाहेबांमुळे तो प्रसंग विनाकारवाईवर अनुयायी पैसे देऊ शकत नसल्याने कसाबसा टळला. २२ फेब्रुवारी १९४१ साली बार्शी तालुक्यातील तडवळे (कसबे) येथील महार मांग परिषदेस जाण्यासाठी ते कुर्डूवाडी जंक्शनवर आले. यावेळी नागरिकांनी बाबासाहेबांचा सत्कार केला. तेथील कार्यक्रम उरकून २३ फेब्रुवारी रोजी पुन्हा माघारी येत असताना बार्शीतील नगर परिषदेच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या होस्टेलला मदत केली म्हणून त्यांनी तिथे जाऊन आभार मानले होते. त्यानंतर ते कुर्डूवाडीत पोहोचले. यावेळी येथील किसन सोनवणे व रेल्वे लाईट स्टाफच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुर्डूवाडीकरांनी १०१ रुपयांची देणगीदेखील  दिली होती. त्यांनी येथील सर्वांचे आभार मानले.

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज सुधारणेच्या चळवळीत अठरापगड जातींच्या शिलेदारांनी योगदान दिले. त्यात माढा तालुक्यातील चार जणांचा समावेश होतो. तेही आज हयात नाहीत. त्यात सोपान गंगाराम पोळ (कुर्डूवाडी), ठाकूजी सावळा जानराव गुरुजी (माढा), शिवमूर्ती मारुती रजपूत (रेल्वे कर्मचारी, कुर्डूवाडी), दलितमित्र केरुजी लंकेश्वर (माढा) यांचा प्रामुख्याने समावेश होतो. हे चौघे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अगदी जवळचे मानले जायचे. 

डॉक्टरांचा दौरा कुर्डूवाडीकडे निश्चित झाला की, या चौघांना स्वतः बाबासाहेब पहिल्यांदा कळवायचे. मग ते त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय नियोजित करीत असत. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी येथील संबंधित चौघे दुपारीच रेल्वेने मुंबईला अंत्यसंस्कारासाठी गेले होते. त्यावेळी ठाकूजी जानराव व शिवमूर्ती रजपूत यांनी त्यांच्या अस्थी सोबत आणल्या होत्या.  त्या आजतागायत त्यांच्या घरात डबाबंद स्थितीत जतन करून ठेवल्या आहेत. 

कुर्डूवाडीत स्मारकासाठी पाठपुरावा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कुर्डूवाडी नगरीत त्यांच्या इतिहासाचे वर्णन केलेली कोनशिला किंवा मोठे सुसज्ज असे स्मारक रेल्वेस्थानकावर बसविण्यात यावे म्हणून येथील प्रा. डॉ. आशिष रजपूत हे रेल्वेच्या वरिष्ठांकडे सध्या पाठपुरावा करत आहेत. माढा न्यायालयात जमिनीचा दावा लढलाडॉ. बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई या आजारी पडल्यानंतर काही दिवसांसाठी हवापालटासाठी माढा तालुक्यातल्या बावीत आल्या होत्या. त्याचबरोबर येथील मोडनिंब या गावातील कोठारी बंधूंच्या जमिनीच्या वादासंदर्भात माढा कोर्टात स्वतः हजर राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक केस लढवली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती