शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

Breaking; वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन भूमकरांची एकहाती सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 12:42 IST

17 पैकी  13 जागा भूमकर यांना तर भाजपला चार जागा

 

वैराग/ बार्शी: तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या वैराग नगरपंचायतिच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे वैरागचे सुपुत्र निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.17 पैकी 13 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला,चार जागा भाजप(आमदार राजेंद्र राऊत) याना मिळाल्या. तर शिवसेनेचे दिलीप सोपल यांच्या गटाला खाते देखील उघडता आले नाही.

 निवडणुक  ही वैराग शहराची असली तरी चर्चा मात्र संपुर्ण तालुक्यात सुरु आहे. या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आगामी झेडपी,पंचायत समिती व बार्शी नगरपालिका निवडणुकीवर प्रत्यक्षपणे होणार असल्याने तालुक्यातील प्रमुख नेते आ. राजेंद्र राऊत व माजी आ. दिलीप सोपल व राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमकर  हे विचारपुर्वक खेळ्या खेळत आहेत. शिवसेना व  कॉंग्रेस शेवटच्या क्षणी एकत्र आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप स्वबळावर लढले होते.

स्वतः निरंजन भूमकर आणि त्यांच्या पत्नी ही विजयी झाल्या आहेत.प्रभाग क्रमक 1 ते 7 ,9,10,12,13,14,15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर 8,11,16 व 17 मध्ये भाजप विजयी झाले आहे. माजी आमदार चंद्रकांत निंबाळकर यांचे नातू शाहू निंबाळकर हे भाजपकडून विजयी झाले आहेत. तर त्यांचे पुतणे माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद निंबाळकर हे पराभूत झाले आहेत. एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वैरागची निवडणुक असली तरी या निवडणुकीचा केंद्रबिंदू हा बार्शीच आहे़. राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर सोडले तर भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांची सुत्रे ही बार्शीकरांच्या ताब्यात होती.मात्र निकालानंतर खरा केंद्रबिंदू हा वैरागच होते हे सिद्ध झाले आहे.

  बार्शीतील प्रसिध्द उद्योजक दिलीप गांधी यांना वैरागच्या आखाड्यात उतरवऊन आ राजेंद्र राऊत यांनी मोठी खेळी केली होती मात्र त्याना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राजन पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे  व लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी ही प्रचार करून बळ दिले होते.

विजयी उमेदवार खालीलप्रमाणेअतुल मोहिते-राष्ट्रवादी काँग्रेसनिरंजन भूमकर-राष्ट्रवादी काँग्रेसतृप्ती भूमकर -राष्ट्रवादी काँग्रेसअनुप्रिया घोटकर-राष्ट्रवादी काँग्रेसगुरुबाई झाडमुखे-राष्ट्रवादी काँग्रेसआसमा मिर्झा-राष्ट्रवादी काँग्रेसचेपद्मिनी सुरवसे-राष्ट्रवादी काँग्रेसजैतूनबी बागवान -राष्ट्रवादी काँग्रेसअक्षय ताटे-राष्ट्रवादी काँग्रेसनागनाथ वाघ-राष्ट्रवादी काँग्रेस श्रीशैल  भलशंकर -भाजपराणी आदमाणे-भाजपाशाहू निंबाळकर -भाजपसौ.माने रेड्डी -भाजप

टॅग्स :Solapurसोलापूरbarshi-acबार्शीElectionनिवडणूकPoliticsराजकारणDilip Sopalदिलीप सोपल