शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; ऊस तोडणी मुकादमाने घेतला गळफास; सांगोला तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 15:20 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सांगोला :  अज्ञात कारणावरून ऊस तोडणी मुकादमाने दोरीच्या साह्याने लिंबाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवार ५ रोजी सकाळी १० च्या सुमारास वाढेगाव (हजारेवस्ती नं. २ ता. सांगोला) येथे घडली. सचिन बाळू हजारे (वय २८) असे आत्महत्या करणाऱ्या ऊसतोडणी मुकादमाचे नाव आहे. दरम्यान त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. 

वाढेगाव हजारे वस्ती नं. २ येथील ऊस तोडणी मुकादम सचिन बाळू हजारे यांनी बुधवार ४ रोजी ऊस तोडणी कामगारासमवेत आई-वडिलांना कारखान्यावर पाठवून दिले होते,एक कामगार येणे बाकी असल्याने तो पाठीमागे थांबला होता. दरम्यान सचिन हजारे यांनी गुरुवार ५ रोजी सकाळी पत्नी सविताला चुलत्याकडे जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर पडला बराच वेळ तो आला नाही, मोबाईल स्विच ऑफ लागत होता, म्हणून पत्नी सासऱ्याच्या घराकडे निघाले असता नवरा सचिन हजारे यांनी लिंबाच्या फांदीला गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी सपोनि प्रशांत हुले, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय आवताडे दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSuicideआत्महत्याSugar factoryसाखर कारखानेagricultureशेती