शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या ब्रेनडेड गुरुजींचं सोलापुरात अवयवदान: लिव्हर, डोळे, किडनी केले दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:11 IST

लातूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर त्यांना सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

सोलापूर : विद्यार्थ्यांना विद्यादानाचं कार्य करणाऱ्या शिक्षकावर अपघाताचं अकाली संकट ओढावलं. अथक प्रयत्न करूनही रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या उपचारादरम्यान ब्रेनडेड (मेंदू मृत) झाल्याचं निदान झालं. कुटुंबीयांनी ओढावलेल्या संकटाला धिरानं तोंड देत अवयवदानाचा निर्धार केला. शनिवारी ब्रेनडेड शिक्षक विठ्ठल गंगाधर भुरके (वय ३८) यांच्या नातेवाईकांनी अवयवदानास मान्यता दिली. सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया पार पडली. त्यांचे लिव्हर, दोन किडनी, डोळे दान केले. लातूर येथील जयभवानी माध्यमिक विद्यालय सुगाव येथे कार्यरत असलेले शिक्षक विठ्ठल गंगाधर भुरके (वय ३८, मूळ कुसळवाडी, ता. हादगाव, जि. नांदेड) यांचा लातूर येथे अंबाजोगाई रोडवर मोटारसायकलचा अपघात झाला होता. लातूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर त्यांना सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यादरम्यान डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांचा ब्रेनडेड झाल्याचं सांगितले. यावेळी कुटुंबीयांशी चचर्चा केल्यानंतर त्यांच्या पत्नी, भाऊ व भाचे यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांच्या पत्नी अरुणा भुरके, वडील गंगाधर भुरके, लहान भाऊ लिंबाजी भुरके, भाचे डॉ. मंगेश डुकरे यांनी धाडस करून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातूनही कौतुक केले जात आहे

कोणाचातरी जीव वाचणार 

अवयवदानाची सर्व प्रक्रिया यशोदारा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली पार पडली. आपला व्यक्ती गेला तरी त्यांच्या अवयवाचा इतर रुग्णांना फायदा होईल, असे ब्रेनडेड विठ्ठल भुरके यांच्या पत्नी अरुणा भुरकेंसह त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. यावेळी यशोधरा हॉस्पिटलचे डॉ. शिवपुजे व त्यांचा सर्व स्टाफ यांनी मृत भुरके यांच्या कुटुंबीयांचे अवयवदानाच्या धाडसी निर्णयाबद्दल आभार मानले.

जनजागृतीची गरज 

यावेळी बोलताना नांदेड येथील डेल्टा हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बळीराम भुरके यांनी आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती अवयवदान करत आहे. आमच्या कुटुंबातील व्यक्ती अवयवाच्या माध्यमातून जिवंत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. वैद्यकीय क्षेत्रात अवयवदानाबद्दल जनजागृती होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :SolapurसोलापूरOrgan donationअवयव दान