शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! बॉण्ड पेपर लिहून द्यावं लागणार; तरच क्रिकेटसाठी मैदान मिळणार, इंदिरा गांधी स्टेडियमचे बुकींग झाले ऑनलाइन 

By appasaheb.patil | Updated: June 21, 2023 19:09 IST

शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) चे मैदान क्रिकेट स्पर्धेसाठी देण्यात येत आहे.

सोलापूर: शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) चे मैदान क्रिकेट स्पर्धेसाठी देण्यात येत आहे. या मैदानावर सामने अथवा स्पर्धा घ्यावयाची असल्यास आता संयोजकास ऑनलाइन बुकींगची सोय महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, बॉण्ड पेपरवर हमी पत्र लिहून दिल्यावरच मैदान खेळासाठी मिळणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंदिरा गांधी स्टेडियम येथे पहिल्या टप्प्यात मैदानावरील ११ मुख्य खेळपट्टया तसेच ६ सराव खेळपट्टया तयार करण्यात आल्या आहेत. या मैदानावर पॅव्हेलियन इमारत, पंचकक्ष, व्ही.आय.पी कक्ष आणि माध्यम कक्ष ही तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आय.पी.एल अथवा रणजी सामने भरवण्याची सोय झाली आहे. इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क मैदान ) हे क्रिकेट स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आले असून त्यासाठी आता ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे.

असे आहे मैदानाचे भाडे...क्रिकेट मैदान बुकिंग करण्याकरिता लेदर बॉल शनिवारी व रविवारी असल्यास प्रति दिवस १३ हजार रूपये अधिक जीएसटी, तसेच लेदर बॉल सोमवार ते शुक्रवार प्रति दिवस ९ हजार अधिक जीएसटी भरावे लागणार आहे. तसेच पाच दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस क्रिकेट मैदान बुकिंग केल्यास लेदर बॉल साठी सोमवार ते रविवार ७ हजार अधिक जीएसटी भरावे लागणार आहे.

असे करा ऑनलाइन बुकींग...टूर्नामेंट स्पर्धेसाठी मैदान बुक करावयाच्या झाल्यास कमीत कमी पाच दिवस बुकिंग करावा लागेल. अर्जदाराने मैदान बुकिंग हे महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे. तसेच मैदान बुकिंग करतेवेळी विहित नमुन्यातील हमीपत्र ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे. त्यासाठीचे आवश्यक ते कागदपत्रे आपल्याला ऑनलाईन भरावे लागणार आहे. बुकिंगचे भाडे ऑनलाईन पद्धतीने भरणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाईन बुकिंग सामन्याचे तारखेच्या एक वर्ष आधीपासून करता येईल.

टॅग्स :Solapurसोलापूर