शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘संचारबंदी’त बोगस पासचा फंडा; बनावट पास जप्त, पंढरीत दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 16:04 IST

'कलर झेरॉक्स'वाल्याच्या घरात प्रिंटिंग; भाजीवाला हुडकायचा ग्राहक

ठळक मुद्देपंढरपूर नगरपरिषदेच्या पथकाने दहा बनावट पास जप्त केले आहेतकिती लोकांना पास विक्री केली, याबाबत शोध घेण्याचे काम पोलीस यंत्रणेमार्फत होणार बनावट पास बनवणाºया दोघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर : संचारबंदीच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाºया लोकांना शासनाकडून पास देण्यात आलेले आहेत. परंतु या अत्यावश्यक सेवा पासची  प्रति तीनशे रुपयांप्रमाणे  विक्री करण्याचे काम दोन बहाद्दरांनी केले आहे.

सोलापूरमध्ये २३ मार्चपासून संचारबंदी करण्यात आली आहे. तेव्हापासून अनेक जण घरात बंदिस्त आहेत, तर अनेक जण अनेक निमित्त करून घराबाहेर पडण्याचे बहाणे शोधताहेत. अशा रोज शेकडो लोकांवर कारवाई करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

शहरात जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा करणाºया लोकांना नगरपालिका प्रशासनाकडून पास देण्यात आले आहेत. त्याचबरोबर नगरसेवक व त्यांचे पाच स्वयंसेवक यांनादेखील पास देण्यात आले आहेत. 

अत्यावश्यक सेवा देणारे लोक निर्भीडपणे बाहेर पडत असल्याचे पाहून पंढरपुरातील दोन बहाद्दरांनी नवा  फंडा काढत... अत्यावश्यक  सेवेच्या पासची विक्री करण्याचा नवा धंदा सुरू केला आहे. 

सूरज मनोहर जाधव (वय ३०, महावीर नगर, पंढरपूर) हा त्याच्या घरी असलेल्या कलर प्रिंटरच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाचे बनावट पास तयार करत असे. त्या पासला प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे ग्राहक शोधण्याचे काम उमेश मोहन छत्रे (रा. महावीर नगर, पंढरपूर) करत होते. या दोघांकडून पास घेऊन अंबादास रामकृष्ण सुरवसे हे भाजी विक्रेते  पासची विक्री करत होते. यादरम्यान कोरोना नियंत्रण पथकातील नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक चिदानंद सर्वगोड, अतिक्रमण विभागाचे दत्तात्रय होटकर यांनी सुरवसे यांच्या पासची तपासणी केली. यावेळी त्यांना हे पास बनावट असल्याचे लक्षात आले. 

त्या परिसरात पेट्रोलिंग करत असलेले पोलीस कॉन्स्टेबल वीरचंद हजारे व पोलीस नाईक धनंजय जाधव यांच्या मदतीने बनावट पास तयार करणाºया दोघांच्या घरी जाऊन छापा टाकला व त्यांच्याकडून पास व कलर प्रिंटर ताब्यात घेण्याची कारवाई नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक चिदानंद सर्वगोड यांनी केली आहे. 

दहा बनावट पास जप्त- पंढरपूर नगरपरिषदेच्या पथकाने दहा बनावट पास जप्त केले आहेत. आणखी किती लोकांना पास विक्री केली, याबाबत शोध घेण्याचे काम पोलीस यंत्रणेमार्फत होणार आहे. तसेच बनावट पास बनवणाºया दोघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpurपंढरपूर