शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

पंढरीत बोगस डॉक्टरला अटक

By admin | Updated: July 8, 2014 00:47 IST

आषाढी वारीतील घटना; बोगस डॉक्टरविरोधी पथकाची कारवाई

पंढरपूर : आषाढी यात्रेत गर्दी पाहून कोणताही शासकीय परवाना नसताना पैसे कमविण्याच्या उद्देशाने रुग्णांना तपासण्याचे दुकान मांडलेल्या बोगस डॉक्टरला विरोधी पथकाने पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार सोनवणे यांनी सांगितले.डॉ. मंदार सोनवणे यांना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास माहिती मिळाली असता मार्केट यार्ड पंढरपूर येथे एक इसम स्वत: डॉक्टर आहे, असे भासवून लोकांना तपासून अ‍ॅलोपॅथीचे इंजेक्शन व गोळ्या देत होते. यावेळी डॉ. सोनवणे यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी डॉ. पंकज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने औषध विभागाचे सहायक आयुक्त वीरेंद्र रवी, औषध निरीक्षक व्ही. व्ही. नागरे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य इमारतीसमोर गेले, तेव्हा त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या (क्र. एम. एच. ३१/झेड ५७६१) गाडीमध्ये श्रीराम गोविंद पोपटघाट (रा. कहाकर बु।।, ता. सेनगाव, जि. हिंगोली) हा लोकांची तपासणी करत होता. त्याच्याकडे यावेळी अ‍ॅलोपॅथीची औषधे, इंजेक्शन व स्टेथोस्कोप होता.वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची सनद बाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पथकाने श्रीराम पोपटघाट त्याच्या कागदपत्राची मागणी केली असता त्याच्याकडे कोणतीही मूळ कागदपत्रे सादर केली नाहीत. स.पो.नि. जी. आर. बल्लाळ यांनी त्यास ताब्यात घेतले. त्यांची त्याची चौकशी केली असता तो दहावी पास असल्याचे निदर्शनास आले. ----------------------------------पंढरपुरातील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्वांनी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अन्वये वैद्यकीय व्यवसाय ठिकाणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची सनद दर्शनी भागावर लावावी.- वीरेंद्र रवीसहायक आयुक्त, औषध प्रशासन-----------------------------पंढरीत आलेल्या भाविकांनी उपचारासाठी डॉक्टरांकडे जाताना डॉक्टर बोगस आहे का नाही याची खात्री करूनच जावे अन्यथा रुग्णांना इंजेक्शन व औषधाचे रिअ‍ॅक्शन येऊन त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.- मंदार सोनवणे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय