शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रक्तदान हेच श्रेष्ठदान; मधुमेह, हृदयरोग, कॅन्सरला हरविण्यासाठी रक्तदान आवश्यक

By appasaheb.patil | Updated: June 14, 2020 08:04 IST

जागतिक रक्तदाता दिन विशेष; २१५ वेळा रक्तदान करणारे सोलापूरचे अशोक नावरे...!

सुजल पाटील

ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळवून देते. समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी रक्तदान करणे काळाची गरज आहे़ एवढेच नव्हे तर  एक स्वेच्छा रक्तदाता म्हणून सहभागी होऊन आपल्या नातेवाईक व मित्र परिवारालाच प्रवृत्त करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा़  रक्तदान हेच श्रेष्ठदान असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे़ मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते थॅलसिमीया, सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना, कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते.  कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही. आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिटमधून रक्त व रक्त घटक वेगळे केले जातात. (तांबडया पेशी, रक्तिबबीका (प्लेटलेट्स) व प्लाझमा) अशापकारे आपल्या रक्तदानाने १ ते ३ रुग्णांचे प्राण वाचू शकतात.

साधारणत १८ ते ६५ या वयोगटातील लोकांना रक्तदान करता येऊ शकते. ज्यांचे वजन साधारणत ७४ किलो आहे त्यांच्या शरिरात ५ लिटर रक्त असल्याचे वरभे यांनी सांगितले. आज आपण कितीही विकसित झालो असलो तरी कोणीही रक्ताच्या कारखान्याची निर्मिती करू शकले नाही. शासकीय पातळीवर रक्तदान संदर्भात जागृती केली जात असली तरी त्या प्रमाणात रक्तदाते मात्र समोर येत नाही. एका व्यक्तीने एकदा रक्त दिल्यानंतर साधारणत तीन महिन्यांनी रक्त देणे आवश्यक आहे. मधुमेह असलेले रुग्ण जर इन्शुलिन घेत असतील तर त्यांना रक्तदान करता येत नाही. रक्तदान करताना शरिरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ ग्रॅमपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. रक्तदानानंतर शरिरात रक्ताची पूर्ती २४ तासात होते. रक्तदाताच्या शरीरातून ३५० किंवा ४५० मि.लि. पर्यंत रक्त घेऊ शकतात. जे नेहमीच रक्तदान करतात त्यांना मधुमेह, हृदयरोग, कॅन्सरसारखे अतिगंभीर आजार होत नाहीत.-------------------२१५ वेळा रक्तदान करणारे अशोक नावरे

सोलापूर शहरातील प्रसिध्द अशा दमाणी ब्लड बँकेतील अशोक नावरे यांनी आतापर्यंत २१५ वेळा रक्तदान करून महाराष्ट्राच नव्हे संपूर्ण भारतात एक नवा विक्रम केला आहे़ अशोक नावरे हे विजापूर रोडवरील टेलिग्राफ सोसायटी येथे राहतात. त्यांनी १९७५ साली पहिले रक्तदान केले. एवढेच नव्हे तर अशोक नावरे याच्या पत्नी लता नावरे यांनीही ५१ वेळा रक्तदान करून महिलांमध्ये विक्रम प्रस्थापित केला आहे. रक्तदाता दिनाच्या निमित्ताने बोलताना अशोक नावरे म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे़ प्रत्येकाने ऐच्छिक म्हणजेच स्वइच्छेने रक्तदान करावे, कोणत्याही गिफ्ट अथवा अमिषाला पडू नये. आजकाल अनेक रक्त संकलन करणाºया ब्लड बँकांकडून रक्तदात्याला अमिषे दाखवून रक्त संकलित केले जाते हे चुकीचे आहे़ रक्तदान हे दान आहे ते स्वेच्छने करावे. जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून रूग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करावा असेही आवाहन नावरे यांनी केले.----------------रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे...

-    वयाच्या १८ वषार्नंतर (६५ वर्षापर्यंत)-    वजन ४५ कि.ग्रॅ. च्या वर असल्यास..-     रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास..-    आपण पूर्णपणे निरोगी असल्यास..-    दर ३ महिन्यांनी आपण रक्तदान करावे.-     जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात आपण रक्तदान करू शकता.-----------------रक्तदान कोण करू शकत नाहीत ?

-    मागील ३ दिवसांत कोणतेही पतिजैविक औषध घेतले असल्यास.-    मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास.-    मागील १ वर्षात विषमज्वर, काविळ किंवा श्वानदंश होवून रेबीजची लस घेतली असल्यास.-    ६ महिन्यापूर्वी आपली मोठी शस्त्रकिया झाली असल्यास.-    गर्भवती महिला, महिलेला १ वषार्खालील मूल असल्यास किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास.----------------

कायमचे बाद रक्तदाते :-

-    कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, काविळ (ब, क प्रकारची), एड्स, मुत्रिपड रोग, यकृताच्या व्याधी असल्यास.रक्तदानाचे फायदे :

-   रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, काविळ (ब, क पकारची), मलेरिया)-    वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.-    रक्तगट व हिमोग्लोबीनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.-    बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.-    नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग पतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.-    नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे पमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय, यकृता सारखे अवयव स्वस्थ राहतात.

रक्तदाता कार्ड...

स्वेच्छेने रक्तदान करणा-या प्रत्येक रक्तदात्याला लगेच प्रमाणपत्र व कार्ड दिले जाते. या कार्डावर रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते. रुग्णाचे पाण वाचविल्यामुळे आत्मिक समाधान मिळते. तसेच ३ रुग्णांचे पाण वाचविल्याचा पण आनंद होतो.

टॅग्स :SolapurसोलापूरBlood Bankरक्तपेढी