शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या सीमेवर नाकाबंदी, आठ पथकांद्वारे वाहनांची तपासणी

By काशिनाथ वाघमारे | Updated: March 17, 2024 18:03 IST

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर दिवसा चार तर रात्री चार पथक कार्यरत असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी निवडणूक व पोलिस कर्मचारी असे तीन कर्मचारी त्या पथकात असतील.

सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यात कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवर आठ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. ही पथकं रविवारी रात्रीपासून कार्यरत झाली आहेत. यामध्ये निवडणूक कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांचा सहभाग आहे.

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर दिवसा चार तर रात्री चार पथक कार्यरत असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी निवडणूक व पोलिस कर्मचारी असे तीन कर्मचारी त्या पथकात असतील. या पथकाकडून वाहने तपासली जात आहेत. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, शस्त्र आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल केला जात आहे.शनिवारी सहायक निवडणूक अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार विनायक मगर, अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे, दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश स्वामी यांनी पथकं नेमली आहेत.

स्थिर पथकं, व भरारी पथकं असणार आहेत. कर्नाटकची सीमा ही अक्कलकोट तालुक्याला लागून असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. याबरोबरच तहसील कार्यालयाकडून सभेच्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यासाठी चार पथक नेमली आहेत. दोन तपासणी पथक असणार आहेत. खर्च, नियंत्रण टीम, नियंत्रण कक्ष असणार आहे. आचार संहिता कक्ष सुद्धा असणार आहेत.या ठिकाणी आहे नाकाबंदी

नाकाबंदी पथक तडवळ, दुधनी, हिळळी-मणूर, हैद्रा, तोळणूर-माशाळ रोड, वागदरी-हिरोळी, सलगर-निंगदळी अशा आठ ठिकाणी ही नथके नेमली आहेत. प्रत्येक नाकाबंदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर