शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

राईनपाडाच्या दु:खावर पूजाच्या अक्षतांची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 12:24 IST

खवे: वडिलांच्या खुनानंतर अवघ्या तीन महिन्यांत लग्न

ठळक मुद्देलग्नसोहळ्यावर मयत भारत भोसले यांच्या मृत्यूची छाया पसरली मुलीच्या लग्नावेळी पती नसल्याने आईने हंबरडा फोडला या लग्नाची संपूर्ण जबाबदारी जमियत उलमा-ए-हिंद संस्थेने घेतली

मंगळवेढा : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी गोसावी डवरी समाजाच्या पाच जणांची हत्या झाल्यानंतर भेदरलेल्या आणि दु:खाच्या छायेत वावरणाºया समाजातील लोकांच्या भावनांवर फुंकर घालण्यात रविवारी यश आले. निमित्त होते या हत्याकांडात मरण पावलेल्या भारत भोसले यांची मुलगी पूजा हिच्या लग्नाचे. या लग्नाची संपूर्ण जबाबदारी जमियत उलमा-ए-हिंद संस्थेने घेतली होती. मुले पळविणारी टोळी म्हणून राईनपाडा येथे मंगळवेढा तालुक्यातील खवे आणि मानेवाडी येथील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. जमियतने या गावी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करताना मुलींच्या लग्नाची आणि शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे जाहीर केले होते.

 भारत भोसले यांची मुलगी पूजा हिचा विवाह खवे गावातील जालिंदर नागू चौगुले याच्याशी ठरला होता. जमियतचे प्रदेशाध्यक्ष मौलाना नदीम सिद्धीकी, मौलाना इब्राहीम कासमी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर जमियतच्या पदाधिकाºयांनी लग्नासाठी लागणारे सर्व  संसारोपयोगी साहित्य व जेवणाची सोय केली. 

रविवारी झालेल्या या साध्या पद्धतीच्या लग्नसोहळ्यास जमियत उलमा-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना इब्राहीम कासमी, हाजी कय्युम जमादार, हसीब नदाफ, युनूस डोणगांवकर, हाफिज अ.हमीद चांदा, म.रफिक इनामदार, मंगळवेढ्याचे हाफिज रियाज ,हाजी सलीम बागवान, सचिव रमीजराजा मुल्ला, तसलीम आकुंजी उपस्थित होते. 

आम्ही केलेली मदत उपकार नसून इस्लामने सांगितलेल्या मानव कल्याणाची जबाबदारी पार पाडल्याचे मौलाना इब्राहीम कासमी यांनी सांगत नववधू-वरांना शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी जमियतच्या कार्याचे कौतुक करताना पोलीस प्रशासनाकडून अभिनंदन केले. दादाराव भोसले यांनी या लग्नसोहळ्यातून हिंदू-मुस्लीम ऐक्याची जाणीव झाल्याचे मत व्यक्त केले.यावेळी भटके-विमुक्त संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, अखिल भारतीय नाथपंथी डवरी समाजाचे प्रदेश अध्यक्ष प्रा.गौरव इंगोले, महादेव इंगोले,नामदेव इंगोले यांनी जमियतबद्दल गौरवोद्गार काढले.या विवाह सोहळ्यास खवे गावचे सरपंच विकास दुधाळे, मंडल अधिकारी वाकसे,लक्ष्मण इंगोले,नागनाथ इंगोले, गावकरी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

अन् हंबरड्याने मांडव हेलावला- आजच्या लग्नसोहळ्यावर मयत भारत भोसले यांच्या मृत्यूची छाया पसरली होती. मुलीच्या लग्नावेळी पती नसल्याने आईने हंबरडा फोडला. यामुळे सारा मांडव, वºहाडी हेलावून गेले. मुलीच्या चेहºयावरही वडील नसल्याने आनंद नव्हता. ती कमतरता सातत्याने तिच्या चेहºयावर जाणवत होती. या लग्नसोहळ्यात राईनपाडा हत्याकांडात मरण पावलेल्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस