ग्रामपंचायत निकालात भाजपाचं पारडं जड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:24 AM2021-01-19T04:24:16+5:302021-01-19T04:24:16+5:30

माळशिरस तालुक्‍यात ४९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये चार ग्रामपंचायती बिनविरोध, तर एका ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकल्यामुळे ४४ ग्रामपंचायतींची ...

BJP's lead in Gram Panchayat results is heavy | ग्रामपंचायत निकालात भाजपाचं पारडं जड

ग्रामपंचायत निकालात भाजपाचं पारडं जड

Next

माळशिरस तालुक्‍यात ४९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये चार ग्रामपंचायती बिनविरोध, तर एका ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकल्यामुळे ४४ ग्रामपंचायतींची मतमोजणी आज माळशिरस येथील शासकीय गोडावूनमध्ये पार पडली. तालुक्यातील मोरोची, नातेपुते, पिरळे, संग्रामनगर, कुरबावी या ग्रामपंचायतींत विरोधकांना खाते उघडता आले नाही. मोठ्या असणाऱ्या फोंडशिरस, तांदुळवाडी, अकलूज, मांडवेसह काही ग्रामपंचायतींच्या वॉर्डामध्ये चुरस पहायला मिळाली.

गावगाड्यातला दे धक्का...

गावगाड्यात मांडकी, मोरोची, मांडवे, शेंडेचिंचसह काही ग्रामपंचायतींत सत्तापालट झाले, तर भांबच्या संगीता काळे व बिजवडीच्या रसिका भोरे यांना चिठ्ठीद्वारे सदस्य पदाची लॉटरी लागली. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीत विजयसिंह मोहिते-पाटील यांचा वरचष्मा राहिला. मात्र, संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव व धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाचा शिरकाव झाला. कुरभावी ग्रामपंचायतीचे केवळ एका जागेसाठी मतदान झाले. यात अपक्ष उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. शेंडेचिंच ग्रामपंचायतीत एक उमेदवार केवळ एका मताने निवडून आला.

फोटो :::::::::::::::::::::::

नातेपुते (ता. माळशिरस) येथील निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष करताना विजयी नेते व कार्यकर्ते.

Web Title: BJP's lead in Gram Panchayat results is heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.