शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पीकविमा योजनेत भाजपकडून शेतकºयांची फसवणूक : एम. बी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:03 IST

सोलापूर लोकसभा काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटील सोलापूर दौºयावर आले होते.

ठळक मुद्देमहाराष्ट्र व कर्नाटकात चालू वर्षी भीषण दुष्काळ पडला, शेतकºयांच्या हातून पिके गेली - एम. बी. पाटीलप्रधानमंत्री पीकविमा योजनेतून पाच टक्के शेतकºयांनाही भरपाई मिळालेली नाही - एम. बी. पाटीलमोदी सरकारने शेतकºयांना पीकविमा योजनेत फसविले. बड्या उद्योगपतींना कर्जमाफी दिली - एम. बी. पाटील

सोलापूर : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत शेतकºयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप कर्नाटकचे गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी  येथे बोलताना केला. 

सोलापूर लोकसभा काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटील सोलापूर दौºयावर आले होते. सायंकाळी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली. मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजना काढली. या योजनेसाठी देशातील अनेक शेतकºयांनी पैसे भरले.

महाराष्ट्र व कर्नाटकात चालू वर्षी भीषण दुष्काळ पडला. शेतकºयांच्या हातून पिके गेली, पण प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून पाच टक्के शेतकºयांनाही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे या योजनेत मोठा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला. 

मोदी सरकारने शेतकºयांना पीकविमा योजनेत फसविले. बड्या उद्योगपतींना कर्जमाफी दिली, पण दुष्काळाने होरपळून गेलेल्या शेतकºयांची त्यांना दया आली नाही. नागरिकांच्या खात्यावर १५ लाख देतो म्हणाले होते. त्यासाठी नोटाबंदी केली. यातून काळा पैसा बाहेर काढतो म्हणाले होते. पण नोटाबंदीतून सामान्य लोक, व्यापारी हैराण झाले. काळा पैसा बाहेर आलाच नाही. अनेक पातळ्यांवर हे सरकार अपयशी झाले, असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर शिवदारे, जाफरताज पटेल, भीमाशंकर जमादार उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीgovernment schemeसरकारी योजना