शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून तब्बल आठ जणांना आमदारकीचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:21 IST

सांगोला येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे याच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा

ठळक मुद्देभाजपकडून माढा मतदारसंघात नेत्यांचे इनकमिंग जोरदार असले तरी त्याचे मतात रूपांतर होणार नाही, अशी माझी खात्री - संजय शिंदे शरद पवार यांचे राजकारण संपविणार असे म्हणणाºया चंद्रकांत पाटील यांनी बोलताना मर्यादा राखाव्यात - दीपक साळुंखे

सांगोला : भाजपकडून माढा मतदारसंघात नेत्यांचे इनकमिंग जोरदार असले तरी त्याचे मतात रूपांतर होणार नाही, अशी माझी खात्री आहे. कोणाला राज्यपाल, कोणाला राज्यमंत्री तर मतदारसंघात  जवळपास आठ विधान परिषदेची आश्वासने देऊन भाजपच्या नेत्यांनी आमिषे दाखवली आहेत, ती खरी होतीलच असे नाही, ती केवळ आश्वासनेच राहतील, असे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांनी सांगितले.

सांगोला येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी आ. गणपतराव देशमुख होते़ व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, प्रा. पी. सी. झपके, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी झेडपी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, जयमाला गायकवाड, निरीक्षक निर्मला बावीकर, सभापती डॉ. श्रुतिका लवटे, उपसभापती शोभा खटकाळे, उपनगराध्यक्षा स्वाती मगर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे उपस्थित होते. 

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून मी वेगळी चूल मांडली होती, याचा अर्थ मी राष्ट्रवादीपासून फारकत घेतली नाही. मी पूर्वीपासूनच शरद पवार यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे. मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. एकदा बोललो की त्याचे काय परिणाम घडतील ती भोगायची तयारी ठेवून वाटचाल करतो. मग त्यात अपयश आले तरी माघार घेत नाही, हा माझा स्वभाव असल्याचे स्पष्ट  मत उमेदवार संजय शिंदे यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील यांनी भान ठेवून बोलावे: साळुंखेदीपक साळुंखे म्हणाले की, शरद पवार यांचे राजकारण संपविणार असे म्हणणाºया चंद्रकांत पाटील यांनी बोलताना मर्यादा राखाव्यात. त्यांचे जेवढे वय आहे तेवढी वर्षे खा. शरद पवार यांनी लोकसभा व विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे आपण कोणाविषयी बोलत आहोत याचे भान ठेवावे. पवार यांनी संजय शिंदे यांची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. ज्यांचा पाण्याचा केवळ सकाळी आणि संध्याकाळी संबंध येतो ते लोक आता व्यासपीठावरून पाण्याचं बोलू लागल्याची उपरोक्त टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे यांनी केली.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाधाVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील