महायुती करण्यात भाजपची तारांबळमित्र पक्षांच्या अपेक्षा मोठ्या : शिवसेना गत फॉर्म्यूल्यावर ठामरवींद्र देशमुख, सोलापूर : विधानसभेप्रमाणेच मित्र पक्षांसमवेत मोट बांधून आगामी महापालिकेची निवडणूक लढण्याची भारतीय जनता पार्टीची इच्छा असली तरी ही महायुती करण्यात भाजपची मोठी तारांबळ होत आहे. मित्र पक्षांकडील इच्छूकांची संख्या वाढत असल्यामुळे त्या पक्षांच्या भाजपकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य महायुतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी महायुती करण्यासंदर्भातील पक्षाची सकारात्मक स्पष्ट केली. महायुतीतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) आणि राष्ट्रीय समाज पक्षाची चर्चा सुरू असून, या वाटाघाटीतून जागावाटपाबाबतचे सर्वमान्य समीकरण समोर येईल, असे त्यांनी सांगितले. भाजपकडून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, प्रा. निंबर्गी आणि पक्षाची गाभा (कोअर) समिती चर्चा करीत आहेत. या नेत्यांनी महायुतीतील दोन्ही पक्षांशी चर्चेची एक - एक फेरी पूर्ण केली आहे. शिवसेना हा भाजपचा सर्वात जुना आणि नैसर्गिक मित्र पक्ष आहे. त्या पक्षाबरोबरच्या वाटाघाटी करण्यात भाजपला अधिक रस असला तरी महायुती होण्यासाठी भाजपकडून दाखविल्या जात असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाला अन्य मित्र पक्ष दाद देत आहेत.राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे म्हणाले की, महायुती होण्यासाठी भाजप सकारात्मक असल्यामुळे वाटाघाटी फलदायी होतील, अशी आशा आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे यासंदर्भात पालकमंत्री देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या संपर्कात आहेतच; पण स्थानिक पातळीवर शहर अध्यक्ष नितीन शिवशरण यांच्यासह आपण पालकमंत्र्यांशी चर्चा करीत आहोत. महायुती करण्यात भाजपला फायदा होणार आहे. रासपची स्थापना सन २००३ मध्ये झाली. त्यानंतर सलगपणे आम्ही महापालिकेची निवडणूक लढवित आहोत. शहरात आमचेही मतदार आहेत. सध्या पक्षाकडे इच्छूक उमेदवारांची संख्या ४० आहे. त्यामुळे आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्यात, ही आमची अपेक्षा आहे.शिवसेनेला महायुती होण्याबाबत फारसे देणे - घेणे नाही. त्या पक्षाला केवळ भाजप - सेना युतीसाठीच्या वाटाघाटीतच रस असल्याचे दिसून येते. शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी सांगितले की, भाजपचे नेतृत्त्व दिवंगत खासदार लिंगराज वल्याळ यांच्याकडे होते, तेव्हापासून जागावाटपाचे जे सूत्र ठरलेले आहे. त्यानुसारच आम्हाला ४३ जागा हव्या आहेत. शिवसेनेकडे इच्छूकांची संख्या मोठी आहे. संपर्क नेते खासदार राहुल शेवाळे यांच्या २४ आणि २५ जानेवारीदरम्यानच्या सोलापूर दौऱ्यात युतीसंदर्भात आमच्या नेत्यांच्या भाजपबरोबर वाटाघाटी होतील, अशी माहिती त्यांनी दिली.रिपाइंच्या आठवले गटाने भाजपकडे १३ जागांची मागणी केली आहे. या पक्षाकडेही इच्छूकांची संख्या वाढत आहे. पक्षाचे नेते राजाभाऊ सरवदे यांनी महायुतीबाबत फलदायी चर्चा होईल, अशी आशा व्यक्त केली असली तरी मागणीनुसार जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचीही पक्षाची तयारी असल्याचे स्पष्ट केले.भाजपच्या मित्र पक्षांच्या या अपेक्षा पूर्ण करणे भाजपसाठी सध्या तरी कठिण वाटत आहे. जागावाटपाच्या गत समीकरणानुसार शिवसेनेला जर ४३ जागा आणि अन्य मित्र पक्षाला त्यांच्या अपेक्षानुसार जागा सोडल्या तर सध्य्मित्र पक्षांच्या अपेक्षा अशापक्षइच्छूकमागणीशिवसेना५८६४३रिपाइं०२५१३रासप०४०समाधानकारक जागााा मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ असलेल्या या पक्षाकडे लढण्यास समाधानकारक जागा उरणार नाही. त्यामुळे महायुती करण्यात भाजपची तारांबळ होत असल्याचे दिसून येत आहे.
महायुती करण्यात भाजपची तारांबळ
By admin | Updated: January 23, 2017 22:58 IST