शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 15:04 IST

राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त अर्पणा गीते, पोर्णिमा चौगुले, शमिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे सुर्यकांत पाटील यांच्यासह शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़

ठळक मुद्देराज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलापोलिसांना आठ तासांचीच ड्यूट असली पाहिजे : रणजित पाटील सोलापूरातील पोलीसांच्या घरासाठी माहिती घेतली असून, त्यासाठी पाठपुरावा करणार : रणजित पाटील

अमित सोमवंशीसोलापूर दि ८  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यावर पाळत ठेवत असल्याचे बोलले जात आहे़ मात्र राज्य सरकारच्या यंत्रणेकडून शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यावर पाळत ठेवली जात नाही. हा आरोप चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज येथे स्पष्ट केले.राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त अर्पणा गीते, पोर्णिमा चौगुले, शमिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे सुर्यकांत पाटील यांच्यासह शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ सरकारतर्फे विरोधी पक्षाचे नेते आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत असल्याचा आरोपही हल्ली केला जात आहे. यासंदर्भात विचारले असता त्यांनी वरील स्पष्टता केली.     पुढे बोलताना रणजित पाटील म्हणाले की, पोलिसांना आठ तासांचीच ड्यूट असली पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच प्रायोगिक तत्वावर मुंबई येथे पोलिसांची आठ तास ड्युटी करण्यात आली आहे, राज्यातही अशाच पध्दतीची आठ तासाची ड्यूटी करण्याचा सरकारचा मानस आहे़ हे सरकार पोलिसांच्या घरासाठी विविध योजना राबवत आहे.  सोलापूरातील पोलीसांच्या घरासाठी माहिती घेतली असून, त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  मागील डिसेंबर महिन्यात प्रत्येक जिल्ह्याला फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) लॅब दिलेली आहे. अपराध सिध्दतेसाठी पुरावा गरजेचा असतो, म्हणुन प्रत्येक जिल्हा ठिकाणी आणि पोलीस कमीशनरला मोबाईल लॅब दिलेली आहे. रक्ताचे नमुने, केसाचे नमुने व फिगर प्रिट इत्यादी अनेक बाबीसाठी थेट जागेवर जाऊन तंत्रकुशल व्यक्तीकडून घेण्यात येत आहे. सर्व पोलीस ठाणे ‘सीसीएनएस’ ने जोडत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोलापूर शहरासाठी आणखी  चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव आहे. येत्या काळात बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.-------------------‘सीसीटीव्ही’ चे जाळे उभे करणारपोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामात सुसुत्रता आण्यांसाठी शासन प्रयत्न करत आहे. सर्व पोलीस ठाणे ‘सीसीटीव्ह’ चेजाळे निर्माण करणार आहे.य् ाामुळे पोलिसांच्या कामात गती येऊन कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही. याबात योग्य नियोजन करण्यात यश येईल. यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे.आगामी काळात पोलीस तपास यंत्रणा आणि बंदोबस्त यंत्रणा वेगळी असा  प्रस्ताव  आहे त्यावर निर्णय होयचा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरMaharashtraमहाराष्ट्र