शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत २ आॅक्टोबरपासून बायोमेट्रिक हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 14:35 IST

सोलापूर : जोपर्यंत आपले कुटुंब सुरक्षित नाही तोवर आपण आपल्या कामावर लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या कुटुंबांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कामात गतिशीलता येण्यासाठी २ आॅक्टोबरपासून प्रत्येक ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक हजेरी बसविण्याची सूचना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी  दिल्या. सोलापूर जिल्हा ...

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामसेवकांसाठी कार्यशाळेचे आयोजन कुटुंबांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज - डॉ. राजेंद्र भारुड

सोलापूर : जोपर्यंत आपले कुटुंब सुरक्षित नाही तोवर आपण आपल्या कामावर लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या कुटुंबांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कामात गतिशीलता येण्यासाठी २ आॅक्टोबरपासून प्रत्येक ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक हजेरी बसविण्याची सूचना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी  दिल्या. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामसेवकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. भारुड यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जी कुटुंबे पायाभूत सर्वेक्षणापासून दूर राहिली आहेत, अशा कुटुंबांचा तत्काळ यादीत समावेश करावा. समाजकल्याण, दिव्यांग योजनांची अंमलबजावणी, वनराई बंधारे बांधण्याबाबत पुढाकार घ्यावा. गटारमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. प्रारंभी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी रोजगार हमीतून विहिरी व वैयक्तिक स्वच्छतेची कामे घेण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या. यासाठी जॉबकार्ड व रोजनिशी निगडीत सर्व कागदपत्रांची वेळेत पूर्तता करण्याचे आवाहन केले. 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी मागासवर्गीय वस्ती विकास आराखड्यासंदर्भात विविध विकासकामांची माहिती दिली. वंचित घटकांपर्यंत विविध योजना पोहोचविण्याची सरपंच आणि ग्रामसेवकांची जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली. लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर यांनी ग्रामपंचायतीने वनराई बंधाºयाद्वारे पाणी अडविण्याचे उपक्रम घेतल्यास शेतकºयांना फायदा होणार आहे. श्रमदानातून असे बंधारे बांधण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन केले. ह.भ.प. धीरज शर्मा यांनी व्यसनाधीनतेवर मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल नवाळे उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद