शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; पंढरपुरात ट्रक भरून गुटखा जप्त;  गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

By appasaheb.patil | Updated: October 7, 2022 12:52 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : कर्नाटक येथून टेंभुर्णीकडे गुटखा घेऊन जाणारा ट्रक अहिल्यादेवी पूलाजवळ पकडला असून यामध्ये अंदाजे ३० ते ४० लाखाच्या आसपास गुटखा असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि सी. व्ही. केंद्रे यांनी दिली. 

कर्नाटक मधून आलेला लाखो रुपयांचा गुटखा सांगोला मार्गाने पंढरपूर शहरातील अहिल्या पूलाजवळील रस्त्यावरून जात असल्याची माहिती सपोनि सी. व्ही. केंद्रे यांना मिळाली. तत्काळ त्यांनी ही माहिती उप विभागीय पोलिस अधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना सांगून सपोनि सी. व्ही. केंद्रे यांनी संबंधित ठिकाणी भेट दिली.

यावेळी एम.एच. ०९ सीए ३६३० या क्रमांकाचा ट्रक संशयितरित्या जात असताना दिसून आला. त्यास अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याची पोती मिळून आली. त्याचबरोबर ट्रक चालक प्रकाश रेवाप्पा शेजाळे ( वय २१, भीमा तेलगाव, ता. दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर)  याने हा गुटखा  कर्नाटकातून आणल्याचे सांगितले.

पोलिसांनी ट्रक व ट्रकचालकास ताब्यात घेतले असून याबाबतची माहिती अन्न औषध प्रशासनाला कळविले आहे. या ट्रकमध्ये अंदाजे ३० ते ४० लाखाचा गुटखा आहे.

ही कामगिरी सपोनि. सी.व्ही. केंद्गे, दत्तात्रय आसबे, पोहेकॉ शरद कदम, सुरज हेंबाडे, बिपीनचंद्र ढेरे, राजेश गोसावी, पोना सुनिल बनसोडे, दादा माने, सुजित जाधव, समाधान माने, राकेश लोहार, सचिन हेंबाडे, सचिन इंगळे यांनी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस