शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

मोठी बातमी; सोलापूरची मतदार यादी परिपूर्ण; सव्वालाख मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 17:40 IST

९२ हजार लोकांनी केले होते ऑनलाईन अर्ज, शंभर टक्के फोटो, चुका नगण्य

ठळक मुद्देवर्षभरात सव्वा लाख नवे मतदार वाढले : तृतीयपंथी आणि देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी विशेष मोहीमशंभर टक्के फोटो मतदार यादी अन् तांत्रिक चुका नगण्य; सोलापूर राज्यात नंबर वन

सोलापूर : मतदार याद्यांमध्ये तांत्रिक चूक अत्यंत नगण्य, दुबार मतदारविरहित मतदार यादी, तसेच शंभर टक्के फोटो असलेली मतदार यादी या कामामुळे सोलापूरच्या उपजिल्हा निवडणूक कार्यालयाचे काम संपूर्ण राज्यात नंबर वनवर पोहोचले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये सोलापूर जिल्ह्याचे काम पहिल्या क्रमांकावर आहे.

सध्या सोलापुरात ३५ लाख ७२ हजार ७९२ एकूण मतदार आहेत. यात १८ लाख २४ हजार ६४ हजार ६७६ पुरुष मतदार, तर १७ लाख सात हजार ९३७ महिला मतदार आहेत. वर्षभरात एक लाख २५ हजार ५२६ नवे मतदार वाढले आहेत. विशेष म्हणजे, मतदार नोंदणीसाठी तब्बल ९२ हजार नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले.

वर्षभरात साधारण ६८ हजार ९३० मतदारांची नावे वगळली आहेत. २० हजार ७५१ मतदारांनी दुरुस्तीसाठी अर्ज केले. चार हजार १७३ मतदारांनी त्यांचे नाव दुसऱ्या मतदारसंघात समाविष्ट करण्यासाठी अर्ज केले. १५ जानेवारी २०२१ च्या तुलनेत यंदा ७९ तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढली आहे. या सोबत ३० हजार १५६ पुरुष मतदार, तर ३६ हजार ९९२ महिला मतदारांची नावे वाढली आहेत. असे एकूण ६७ हजार नवीन मतदार वाढले आहेत.

 

दुबार नावे वगळली

अधिक माहिती देताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले, नवीन मतदार नोंदणी मोहीम राबवताना अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजिले. १६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेतल्या. वाड्या- वस्त्यांवर जाऊन मतदार नोंदणी मोहीम राबवली. १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मोहिमेत सामावून घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजिले. यासोबत तृतीयपंथी बांधवांकरिता विशेष मतदार नोंदणी जनजागृती मोहीम राबवले. त्यासोबत देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी सुद्धा विशेष कॅम्प घेतले. मतदार यादीत ज्यांचे फोटो नाहीत, त्यांच्या घरी जाऊन फोटो अपडेट करून घेतला. सर्व दुबार नावे वगळली. या सर्व उपक्रमांमुळे सोलापूरची मतदार यादी निर्दोष बनली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकVotingमतदानPoliticsराजकारणSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय