शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मोठी बातमी; राज्यातील द्राक्ष निर्यात वाढतेय; आतापर्यंत सव्वालाख टन द्राक्ष निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 16:42 IST

गुणवत्तेची द्राक्षे; निर्यातीचा वेग सुरूच

सोलापूर : मागील दोन वर्षे कोरोनामुळे अडचण झाल्याची सल मनात ठेवत उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा गुणवत्तेची द्राक्षे तयार केल्याने निर्यात वाढली आहे. सोमवारपर्यंत राज्यातून एक लाख १० हजार ७८२ मे. टन द्राक्षं निर्यात झाली आहेत. अजूनही निर्यातीचा वेग सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. गुणवत्तेचे उत्पादन आणण्यासाठी कष्ट व पैसे खर्च केले तरी मालाची विक्री करायची अडचण होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढच होत गेली. मागील वर्षी देशांतर्गत द्राक्ष विक्रीची अडचण होती; मात्र निर्यात सुरळीत होती. यावर्षी मात्र शेतीमाल विक्रीची अडचण राहिली नाही. शेतकऱ्यांनी यावर्षी निर्यातक्षम गुणवत्तेची द्राक्षे तयार केली असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातून प्रामुख्याने द्राक्षे निर्यात होत आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. युरोपियन देशात ८१ हजार १५३ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. इतर देशात केवळ नाशिक २३ हजार ७३३ टन तर सांगली जिल्ह्यात ५ हजार ८९६ मे.टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. एकुण एक लाख १० हजार ७८२ मे.टन द्राक्ष निर्यात झाली असल्याचे सांगण्यात आले.

नाशिकची वाटचाल लाखाकडे..

राज्यातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांमध्ये ९० टक्के वाटा हा एकट्या नाशिक जिल्ह्याचा आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून ९७ हजार ५४८ टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. अजूनही नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाची निर्यात सुरूच आहे.

* सोलापूरसह राज्यातील इतर जिल्ह्यात उशिरापर्यंत व भरपूर पाऊस पडत राहिल्याने अनेक हेक्टर द्राक्ष बागांची नापिकी झाली. याशिवाय जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

* सुरुवातीला काही कंटेनर युक्रेन व रशियाला गेले मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर या दोन्ही देशाची द्राक्ष निर्यात थांबली असल्याचे सांगण्यात आले.

 

अशी झाली निर्यात...

  • * नाशिक- ९७, ५४८
  • * सांगली- १०, ३४७
  • * सातारा- १,७४१
  • * पुणे जिल्हा- ५२७
  • * उस्मानाबाद- ३८६
  • * लातूर - १३६
  • * सोलापूर- ९७

 

एप्रिल महिनाअखेरपर्यंत द्राक्ष निर्यात होईल. सध्या द्राक्षाचा पीक कालावधी आहे. वाऱ्याचे व अवकाळी संकट आले नाही तर निर्यात वेगाने होईल. देशांतर्गत द्राक्ष विक्रीचे दर वाढत असले तरी द्राक्ष निर्यात करणारा शेतकरी वर्ग वेगळा आहे. यावर्षी आतापर्यंतच्या निर्यातीची आकडेवारी सव्वा लाखाच्या पुढे गेली आहे.

- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, महाराष्ट्र राज्य

 

यावर्षी पाऊस उशिरापर्यंत पडत राहिल्याने द्राक्ष बागामध्ये अनेक दिवस पाणी थांबले होते. त्यामुळे अनेक बागांना फलधारणा झाली नाही. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर खर्च करून आणलेल्या मालाला सतत बदलणाऱ्या हवामानामुळे दर मिळाला नाही. १५ मार्चनंतर दर वाढतोय. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर आहे.

- शिवाजी पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार