शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: डिसेंबर २०२५ नंतर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार; प्रधान सचिवांची माहिती

By appasaheb.patil | Updated: May 18, 2023 18:25 IST

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ योजनेत सहभागी होण्याचा ठराव घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी केले आहे.

सोलापूर : ‘शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी शासनाने ‘डिसेंबर २०२५’ डेडलाईन ठेवली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. या सौर प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी ताब्यात घेण्याकरिता सर्व विभागाने विहित कालमर्यादेत काम करणे आवश्यक आहे. २२ ते २९ मे २०२३ या कालावधीमध्ये सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ योजनेत सहभागी होण्याचा ठराव घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी केले आहे.

सौर कृषी वाहिनी योजनेला गतिमान करण्यासाठी त्यांनी गुरुवारी  सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण, महसूल, वनविभाग, भूमिअभिलेख व संबंधित विभागांची एकत्रित आढावा बैठक घेतली. या बैठकीला प्रधान सचिव आभा शुक्ला यांचेसह ऊर्जा विभागाचे अवर सचिव नानासाहेब ढाणे, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता (सोलापूर) संतोष सांगळे, निखील मेश्राम (मुंबई), महापारेषणचे अधीक्षक अभियंता आर.टी. शेळके, भूमिअभिलेखचे जिल्हा अधीक्षक त.ल. गिडमणी, वनविभागाचे  बाबा हाके, महानिर्मितीचे कार्यकारी अभियंता एस.एम. सोनवणे यांचेसह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

ज्या ग्रामपंचायती स्वयंस्फूर्तपणे सहभागी होतील त्यांना शासनाकडून प्रोत्साहन म्हणून प्रतिवर्ष ५ लाख प्रमाणे तीन वर्षात मिळून १५ लाखाचा निधी दिला जाणार आहे. तर ज्या गावात सरकारी जमीनी उपलब्ध नाहीत त्याठिकाणी शेतकऱ्यांच्या पडीक जमीनी ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. या जमीनीला महावितरणमार्फत प्रति एकर, प्रतिवर्ष ५० हजार रुपये भाडे दिले जाणार असून, त्यामध्ये दरवर्षी 3 टक्के वाढ केली जाईल. या करिता महावितरणने लँड बँक पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलवर माफक नोंदणी शुल्क भरुन शेतकरी आपली जमीन महावितरणला भाड्याने देऊ शकतात.’

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी