शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; माढा, माळशिरससह पाच नगरपंचायतींची निवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 10:45 IST

२१ डिसेंबरला मतदान : एक डिसेंबरपासून कार्यक्रम

सोलापूर : नव्याने स्थापन झालेल्या श्रीपूर] माळुंग, वैराग तसेच नातेपुते या नगरपंचायती तसेच मुदत संपलेल्या माढा व माळशिरस अशा एकूण पाच नगरपंचायतींसाठी निवडणूक विभागाने निवडणूक कार्यक्रम बुधवारी सायंकाळी जाहीर केला असून, यासाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. बुधवार, एक डिसेंबरपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होणार असून, २२ डिसेेंबरला मतमोजणी नियोजित आहे.

या पाच नगरपंचायतींसाठी मंगळवारी, २३ नोव्हेंबर रोजी प्रभाग रचना जाहीर झाली होती. प्रत्येक नगरपंचायतींची सदस्य संख्या १७ असून, या नियाेजित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार आहेत. साेमवारी, २९ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध हाेईल.

श्रीपूर, वैराग व नातेपुते या नगरपंचायती नव्याने स्थापन झाल्या आहेत. त्यासोबत माढा आणि माळशिरसच्या नगरपंचायतींची मुदत संपल्याने तेथे प्रशासक आहे. प्रत्येक नगरपंचायतीत अनुसूचित जातींसाठी ४ जागा, ओबीसीसाठी ४ जागा तसेच महिलांसाठी ९ जागा असे एकूण १७ सदस्यांची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. महिलांच्या ९ राखीव जागांमध्ये अनुसूचित जातीसाठी २ जागा, ओबीसीसाठी २ आणि सर्वसाधारण विभागात ५ जागांचा समावेश आहे.

असा आहे कार्यक्रम

  • अंतिम मतदार यादी प्रसिद्धी दिनांक : २९ नोव्हेंबर
  • निवडणूक कार्यक्रम जाहीर : ३० नोव्हेंबर
  • उमेदवारी अर्ज वितरण व सादर : १ ते ७ डिसेंबर, सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत
  • छाननी : बुधवारी ८ डिसेंबर, सकाळी ११ वाजल्यापासून
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख : १३ डिसेंबर, दुपारी ३ वाजेपर्यंत
  • हरकती घेण्याचा दिनांक : १३ डिसेंबर दुपारी ३ पर्यंत
  • चिन्ह वाटप : १३ डिसेंबर, दुपारी ३ नंतर
  • मतदान दिनांक : २१ डिसेंबर, स. ७.३० ते सायं. ५.३० पर्यंत
  • मतमोजणी : २२ डिसेंबर, सकाळी १० वाजल्यापासून.
टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकPoliticsराजकारण