शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; वेशांतर करून सोलापूर पोलिसांनी मटका घेणाऱ्या तिघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 17:55 IST

याप्रकरणी फौजदार चावडी व जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर : वेशांतर करून पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने शहरात दोन ठिकाणी मटका घेणाऱ्या तिघांना पकडले. याप्रकरणी फौजदार चावडी व जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश सुखदेव सुरवसे (रा. जुनी पोलीस लाइन, निराळे वस्तीरोड) समीर इसाक दामरगिद्दे (रा. साखर पेठ, इकरार अल्ली मशीदजवळ, सोलापूर), यलप्पा काशीनाथ शिंदे (रा. ढोर गल्ली, शुक्रवार पेठ, सोलापूर), असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शहरात चोरून मटका घेत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून वेशांतर करून पथकाने धाड टाकली असता, प्रकाश सुरवसे हा जुनी पोलीस लाइनच्या बोळात कल्याण मटका घेताना आढळून आला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

शुक्रवार पेठेतील ढोर गल्लीमधील महानगरपालिका शाळा क्र. ३ च्या जवळ धाड टाकली असात, इमारतीबाहेर आडोशाला दोघे मटका घेत होते. समीर दामरगिद्दे व यल्लप्पा शिंदे हे दोघे कल्याण नावाचा मटका घेताना आढळून आले. दोघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त हरिश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, हवालदार दिलीप भालशंकर, योगेश बर्डे, वाजीद पटेल, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळुंखे, नरेंद्र नक्का, बापू साठे यांनी पार पाडली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी