शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सोलापुरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 20:29 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शहरांमध्ये ऑक्सिजन बेड व इतर बेडची कमतरता भासू नये, यासाठी शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या नादुरुस्त दवाखाने दुरुस्तीसाठी पावणेचार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या दवाखान्यामुळे २५० बेडची सोय होणार आहे.

नियोजन भवन येथे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहरातील कोविड-19 संबंधित उपाययोजनेबाबत आढावा बैठकीत भरणे बोलत होते. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, यशवंत माने, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह सभापती, गटनेते, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

भरणे म्हणाले, सोलापूर शहरात ग्रामीण भागासह शेजारील जिल्ह्यासह कर्नाटकमधून कोरोनाचे रूग्ण उपचारासाठी येत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने आणि मनपाने योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे. शहरातील महापालिकेचे बंद अवस्थेत असलेले दवाखाने दुरूस्ती करून त्याठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शहरात मनपा आयुक्तांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामाजिक कामातून कोविड केअर सेंटर कोणी उभे करीत असतील तर त्यांना त्वरित मंजुरी द्यावी.

लोकसंख्येच्या प्रमाणात शहरात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटल, ऑक्सिजन बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटर याची तयारी प्रशासनाने त्वरित करावी. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून गरीब रूग्णांवर उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. खाजगी रूग्णालये जादा बिलाची आकारणी करीत असतील तर पथकाद्वारे तपासणी करा. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. कोरोना पेशंटच्या नातेवाईकांना जेवणाची सोय त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 रेमडेसिविर इंजेक्शन दिलेल्या रूग्णांची नोंद ठेवारेमडेसिविर इंजेक्शन गरज असेल त्याच रूग्णांना द्यावे, रूग्ण गंभीर नसेल तर नातेवाईकांनी उगाच इंजेक्शनचा आग्रह धरू नये. डॉक्टरांनी सरसकट सर्वांना रेमडेसिविर इंजेक्शन न देता गरजूंना द्यावे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला जादा इंजेक्शन देण्याचे मान्य केले असून 30 एप्रिलपर्यंत तुटवडा कमी होईल. इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी रूग्णालयांनी इंजेक्शन दिलेल्या रूग्णांची नावे नोंदवहीत ठेवण्याचे निर्देशही भरणे यांनी दिले.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय