शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भोयरेत रंगला दगडफेकीचा खेळ, जगदंबा देवीची महती: खेळाला प्राचीन परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:17 IST

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी, धुलिवंदन साजरे होत असते. मात्र भोयरे (ता. मोहोळ) येथे धुलिवंदन एकमेकांना दगड मारुन साजरे केले जाते.

ठळक मुद्देदगड लागून जखमे झाले तरी दवाखान्यात उपचार घेतले जात नाही. त्या जखमेवर देवीचा अंगारा लावल्यास ती जखम बरी होत असल्याची भाविकांची भावनारोष, शत्रुत्व, द्वेष मनात न ठेवता दगडाची एकमेकांवर उधळण केली जातेमंदिराच्या पायथ्याशी थांबलेल्या गटाची दगडं फक्त धुलिवंदन दिवशी वर दुसºया गटापर्यंत पोहोचतात

हणमंत पवारआॅनलाइन लोकमत सोलापूरनरखेड दि ५ : महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी, धुलिवंदन साजरे होत असते. मात्र भोयरे (ता. मोहोळ) येथे धुलिवंदन एकमेकांना दगड मारुन साजरे केले जाते. याला जगदंबादेवीचा दगडफेकीचा खेळ असे म्हणतात. याला परंपरा असून, हा खेळ भाविक आनंदाने खेळत असतात.भोयरेमध्ये धुलिवंदन दिवशी दुपारी ४ ते ५ च्या दरमान्य श्री जगदंबादेवीच्या पावन नगरीमध्ये आलेले भाविक मंदिरातून दर्शन घेऊन पुजाºयासह भोगावती नदीच्या दिशेने जातात. नदीमध्ये लहान मुलांच्या कुस्त्या होतात. त्यानंतर सर्व भाविक गावाच्या वेशीवर येऊन दोन गटात विभागून दगडं मारतात. यानंतर ते दोन्ही गट जगदंबा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतात. एक गट मंदिराच्या गाभाºयावर तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी उभा असतो. पुजारी मंदिरात पोहोचून खेळास परवानगी देताच दोन्ही गटांमध्ये तुफान दगडफेक सुरु होते. या दोन्ही गटामध्ये अंतर फक्त १५० ते २०० फूट असते. साधारण हा सामना २० मिनिटे चालतो. खेळ बंदचा इशारा होताच दोन्हीही गट दगडं मारण्याचं बंद करुन मंदिरात दर्शन घेण्यासाठी रांगा लावतात. या खेळामध्ये भाविकांना मोठ्या प्रमाणात दगडं लागतात.यामध्ये लहानापासून वृद्धापर्यंत भाविक सहभागी होता. दगड लागून जखमे झाले तरी दवाखान्यात उपचार घेतले जात नाही. त्या जखमेवर देवीचा अंगारा लावल्यास ती जखम बरी होत असल्याची भाविकांची भावना आहे. यात सहभागी झालेले गट राजकीय नसतात. रोष, शत्रुत्व, द्वेष मनात न ठेवता दगडाची एकमेकांवर उधळण केली जाते. मंदिराच्या पायथ्याशी थांबलेल्या गटाची दगडं फक्त धुलिवंदन दिवशी वर दुसºया गटापर्यंत पोहोचतात, अशी आख्यायिका आहे.-----------------पाच-सहा वर्षांपासून दगडं मारण्याचा खेळ खेळतो. यापूर्वीही मला दगड लागले आहेत. आजही डोक्याला मोठी जखम झाली आहे. मात्र यावर इलाज करण्यासाठी मी दवाखान्यात कधीच जात नाही. देवीचा आठवडाभर अंगारा लावल्यास व देवीचे नियम पाळल्यास जखम बरी होते. -लक्ष्मण शिंदे, जखमी युवक------------------देवीचा इतिहासमोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील भोयरे गाव जगदंबादेवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. उंच डोंगरावर हेमाडपंथी श्री जगदंबादेवीचे प्राचीन मंदिर असून, ही देवी तुळजापूरच्या तुळजाभवानीची लाडकी बहीण असल्याचे मानले जाते. ---------------यांना दगडं लागली - लक्ष्मण शिंदे, दिनेश सिरसट, स्वप्निल चव्हाण, दत्तराज पवार, दिनेश सिरसट, विशाल साठे, लक्ष्मण लोहार, नाना पवार, अविनाश थोरबोले, धनंजय साठे या भाविकांना दगडं लागली.

टॅग्स :Solapurसोलापूर