शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

महामानवाला अभिवादन करत सोलापूर शहरातून 'भीम जयंती उत्सव' मिरवणुकीला प्रारंभ

By संताजी शिंदे | Updated: April 23, 2023 19:20 IST

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी ११.३० वाजता उत्साह व जल्लोषात प्रारंभ झाला. रखरखत्या उन्हातही ...

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी ११.३० वाजता उत्साह व जल्लोषात प्रारंभ झाला. रखरखत्या उन्हातही लोकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सुमारे १२५ हून अधिक विविध मंडळांनी या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभाग नोंदवला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहास सोलापूर शहरात दिनांक १४ एप्रिलपासून उत्साहात प्रारंभ झाला. या जयंती सप्ताहाची सांगता रविवार २३ एप्रिल रोजी भव्य अशा मिरवणुकीने होत आहे. या भव्य दिव्य दिमाखदार अशा मिरवणुकीस आज सकाळी ११.३० वाजल्यापासूनच उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.

महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. महापालिकेच्या पहिल्या गाडीची पूजा करून या मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे.  "बोलो रे बोलो जय भीम बोलो", "ताकत से बोलो जय भीम बोलो", "हिम्मत से बोलो जय भीम बोलो" अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे विश्वस्त सुभानजी बनसोडे, उत्सव अध्यक्ष शिवम सोनकांबळे, कार्याध्यक्ष वैशाली उबाळे,  अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष सुहास सावंत हे प्रमूख मान्यवर उपस्थित होते.

रखरखत्या उन्हातही उत्साहाला उधाण आले आहे. डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली. एका पेक्षा एक सरस अश्या आकर्षक सजावटी व देखावे विविध मंडळांनी साकारले आहेत. डोळ्याचे पारणे फिटावे असे मनोहारी दृश्य या मिरवणुकांकडे पाहिल्यानंतर दिसून येते. बहुतांश मंडळांनी डॉल्बीसह भव्य अशा मिरवणुका काढल्या आहेत. डॉल्बीवर डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवन कार्यासह विविध प्रकारची गाणी वाजविण्यात येत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती