शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

केवळ बापूंच्या स्मरणासाठी ९२ वर्षांपासून पलंगाची देखभाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:14 IST

महात्मा गांधींनी घेतली होती बैठक; वळसंगच्या तिसºया पिढीतील मेलकेरी कुटुंबाची अशीही सेवा

ठळक मुद्देमहात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे फक्त भारतच नाही तर जगभर आदर्श म्हणून पाहिले जातेआदर्श महात्म्याची आठवण आपल्याकडे असणे हे भाग्याचे समजले जातेदक्षिण सोलापुरातील वळसंंग येथे महात्मा गांधी यांनी बसलेला पलंग आता सांभाळणे कठीण

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे फक्त भारतच नाही तर जगभर आदर्श म्हणून पाहिले जाते. अशा आदर्श महात्म्याची आठवण आपल्याकडे असणे हे भाग्याचे समजले जाते. मात्र, दक्षिण सोलापुरातील वळसंंग येथे महात्मा गांधी यांनी बसलेला पलंग आता सांभाळणे कठीण जात असून, शासनाने तो आपल्या ताब्यात घ्यावा, अशी विनंती राजशेखर मेलकेरी यांनी केली आहे.

नागरिकांच्या मनात देशप्रेम जागृत करून स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी योगदान द्यावे, यासाठी महात्मा गांधी हे भारत भ्रमण करत होते. याचाच एक भाग म्हणून ते दक्षिण सोलापुरातील वळसंग येथे २७ फेब्रुवारी १९२७ मध्ये आले होते. शंकरलिंग मंदिरासमोरील कट्ट्यावर उभे राहून त्यांनी सभेला मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणामुळे गावात अनेक क्रांतिकारक तयार झाले. त्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले, अशी माहिती (कै.) स्वातंत्र्य सैनिक मल्लप्पा बिदरे यांची मुलगी गौराबाई बिदरे यांनी दिली. महात्मा गांधी यांची आठवण म्हणून त्या ठिकाणी एक फलक देखील लावण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येतो.

शंकरलिंग मंदिर येथे होणाºया बैठकीआधी महात्मा गांधी यांनी राचप्पा मेलके री यांच्या घरी बैठक घेतली होती. या बैठकीत सुमारे ३० नागरिक उपस्थित होते. या बैठकीत महात्मा गांधी हे एका पलंगावर बसले होते. महात्मा गांधी यांची आठवण म्हणून मागील तीन पिढ्यांपासून मेलकेरी कुटुंबीय या पलंगाची काळजी घेत आहेत. आता त्यांचा वाडा जुना झाला असून, तो केव्हाही कोसळू शकतो. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज केला असून, त्याची वाट पाहत असल्याचे राजशेखर मेलकेरी यांनी सांगितले.

इंग्रजांनी वाड्यातील वस्तू फेकल्या रस्त्यावर- महात्मा गांधी हे मेलकरी वाड्यात येऊन गेल्याची माहिती इंग्रजांना मिळाली होती. यानंतर त्यांनी या वाड्यातील वस्तू बाहेर फेकल्या. वाड्यातील काही हत्यारे, तिजोरीतील दागिने हस्तगत केले. तसेच वाड्याची मोडतोडही केली. आठवडाभर गावात तणाव होता. गावातील काही लोक गाव सोडून परागंदा झाले होते. इंग्रजांनी फोडलेली तिजोरी आजही मेलकरी वाड्यात आहे.

महात्मा गांधी व आजोबांची आठवण म्हणून हा पलंग इतके दिवस जपून ठेवला. या पलंगाशी आमच्या कुटुंबीयांच्या भावना जुळलेल्या आहेत. मी जोपर्यंत जिवंत असेन तोपर्यंत या पलंगाची काळजी घेईन, माझ्यानंतरही हा वारसा जतन व्हावा, असे वाटत असल्याने शासनाने हा पलंग ताब्यात घ्यावा, अशी माझी विनंती आहे. यासाठी मला कोणताही मोबदला नको आहे.- राजशेखर मेलकेरी, मेलकेरी वाड्याचे मालक

टॅग्स :SolapurसोलापूरMahatma Gandhiमहात्मा गांधी