शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

सावधान! ११८ गावांत दहापेक्षा अधिक रुग्ण; पंढरपूर, माळशिरसमध्ये सर्वाधिक हॉट स्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 17:43 IST

५६० गावांत संसर्ग: लसीकरण, मास्कमुळे दुसऱ्या लाटेत ६८७ गावे कोरोनामुक्त

सोलापूर : दुसऱ्या लाटेत मास्कचा वापर व लसीकरणावर भर दिल्याने ६७८ गावे कोरोनामुक्त बनली आहेत. आता १० पेक्षा जादा रुग्ण असलेली ११८, तर कमी रुग्ण असलेली ४७४ गावे आहेत.

जिल्ह्यात काेरोनाची पहिली लाट २६ एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात आली. त्यानंतर रुग्ण कमी झाले. मार्च २०२१ नंतर रुग्ण वाढत गेले. येथून दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण वाढले. ग्रामीणमधील १ हजार २४३ गावे, वाड्या-वस्त्यांपैकी बहुतांश ठिकाणी कोरोना पोहोचला. जुलैनंतर शहरात रुग्ण कमी होत गेले. ग्रामीण भागात अक्कलकोट, दक्षिण, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढ्यात रुग्ण कमी झाले. पण पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा व करमाळा या पाच तालुक्यांतील संसर्ग कायम आहे. या तालुक्यांतील संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.

पंढरपूर तालुक्यात भोसे, गादेगाव, खेळभाळवणी, खरातवाडी, पळशी, माळशिरस तालुक्यात नातेपुते, माळशिरस, कदमवाडी, पिंपरी, अकलूज, कारूंडे, खुडूस, निमगाव, करमाळा तालुक्यात जिंती, देवळाली, उमरड, सांगोला, पाचेगाव, कडलास, महुद, वाटंबरे, आलेगाव, खवासपूर या गावांमध्ये सर्वाधिक रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. याउलट कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये ग्रामस्थ खबरदारी घेत आहेत. मास्कचा वापर, गरज असेल तरच बाहेर पडणे आणि गावातील ज्येष्ठांचे लसीकरण वाढविण्यावर भर दिल्याने गाव कोरोनामुक्त होण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpurपंढरपूरsangole-acसांगोलाmalshiras-acमाळशिरस